सैफवरील हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर, हल्ला आंतरराष्ट्रीय कटाचा भाग, पोलिसांनी व्यक्त केली शक्यता

सैफवरील हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर, हल्ला आंतरराष्ट्रीय कटाचा भाग, पोलिसांनी व्यक्त केली शक्यता

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांग्लादेशी घुसखोराला अखेर चार दिवसांनी रविवारी अटक करण्यात आली. हल्लेखोर ठाण्यातील कासारवडवलीच्या जंगलात लपल्याची खबर मिळाली होती. त्या आधारे मुंबई व ठाणे पोलीस दलातील तब्बल दीडशे पोलिसांनी कासारवडवली जंगलात रात्रभर सर्च ऑपरेशन राबवले. सात तासांचा फिल्मी स्टाईल थरार चालला. संपूर्ण लेबर कॅम्पला वेढा घालण्यात आला. याचदरम्यान आरोपी मोहम्मद शरीफ शहजादने काही वेळासाठी मोबाईल सुरू करताच लोकेशन ट्रेस झाले आणि पोलिसांनी पहाटे त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले. सैफवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्यानंतर न्यायालयाने शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सैफवर हल्ला करून फरार झालेल्या शहजादने तीन दिवस पोलिसांना गुंगारा दिला. अखेर चौथ्या दिवशी पोलिसांना त्याच्या ठावठिकाण्याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे मुंबई व ठाणे पोलिसांच्या दीडशे जणांचा फौजफाटा शनिवारी रात्री आठच्या सुमारास कासारवडवलीच्या जंगलात दाखल झाला आणि सुरू झाले सर्च ऑपरेशन. हिरानंदानीजवळील लेबर कॅम्पमधील पत्र्याच्या घरांना पोलिसांनी अक्षरशः वेढा घातला. मजुरांना घराबाहेर काढून त्यांची चौकशी सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच मध्यरात्रीला शहजादने स्वतःचा मोबाईल काही वेळासाठी सुरू केला आणि त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी ट्रेस केले. त्यानुसार जवळच्या जंगलाला घेरले आणि तिवरांच्या आड लपलेल्या शहजादला झडप घालून पकडले.

मुझे थोडा खाना दो..

रात्री उशिरा लेबर कॅम्पमध्ये लपण्यासाठी आलेला शहजाद याने एका घरात घुसून ‘मैने दोन दिन से खाना नही खाया है.. थोडा खाना दे दो…’ अशी विनवणी केली. त्यानंतर त्याला घरातील लोकांनी जेवायला दिले. जेवल्यानंतर तो पुन्हा घराबाहेर निघून गेला, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

शहजादची सात वर्षांपूर्वी घुसखोरी

शहजादने सात वर्षांपूर्वी अवैधपणे हिंदुस्थानात घुसखोरी केली होती. तो हिंदुस्थानात नेमका कशासाठी आला होता? त्याचा हेतू नेमका काय होता? त्याला सेलिब्रेटी राहतात त्या परिसराची माहिती होती का? याचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी त्याची कोठडी मागताना सैफवरील हल्ला आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली. त्याच अनुषंगाने शहजादच्या शोधासाठी गुन्हे शाखा व पोलिसांनी 100 पथके तयार केली होती. दरम्यान, अटकेनंतर त्याला रविवारी वांद्रय़ातील ‘हॉलिडे’ कोर्टात हजर केले होते. ओळख लपवण्यासाठी त्याने केस कापले होते.

न्यायालयात काय घडले?

निळय़ा रंगाचे शर्ट झालेल्या आरोपीला चेहरा झाकून कोर्टात हजर केले. न्यायाधीश के. के. पाटील याच्या आदेशानंतर शहजादच्या चेहऱयावरचा काळा कपडा काढण्यात आला. यावेळी तपास अधिकाऱयाने शहजादच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. शहजादने केलेल्या हल्ल्याचा हेतू चोरीचाच होता की अन्य होता? सुरक्षा असतानादेखील तो चाकू घेऊन आत कसा शिरला? त्याला कोणी मदत केली? हल्ला केल्यानंतर त्याने कपडे बदलले होते, ते कपडे कुठे ठेवले? चाकूचा तुकडा त्याने कुठे टाकला? आदी बाबींचा सखोल तपास करायचा असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. यावेळी शहजादतर्फे युक्तिवाद करण्यासाठी दोन वकील उभे राहिले. दोघांमध्ये वकीलपत्र घेण्यावरून रस्सीखेच झाली. अखेर कोर्टाने दोघांनाही युक्तिवाद करण्यास परवानगी केली.

गुन्हे शाखा करणार तपास

सैफ हल्ला प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मूळचा बांगलादेशचा रहिवासी असलेला शहजाद सध्या विजय दास असे नाव बदलून वावरत असल्याचे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले. त्याने सुरुवातीला ठाणे, मुंबईत काम केल्याचे समजते. हल्ला केल्यानंतर तो दादर रेल्वे स्थानकातही दिसला. त्यानंतर त्याने पह्न बंद केला. हल्ल्याच्या बातम्या समजून घेण्यासाठी तो अधूनमधून फोन चालू-बंद करायचा. तो मार्पेट परिसरात फिरल्याचे सीसीटीव्ही पॅमेऱयात दिसले आहे. दादरमध्ये त्याने मोबाईलच्या दुकानात एअरफोन खरेदी केले. तपासादरम्यान पोलिसांना एक नंबर मिळाला. तो नंबर वांद्रे व दादर परिसरात ऑक्टिव्ह असल्याचे निदर्शनास आले. शहजादने अनेकदा त्याचे लोकेशन बदलले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

जंगलातील एका खड्डय़ात लपून बसलेला शहजाद काही वेळासाठी मोबाईल सुरू केल्याने पोलिसांच्या जाळय़ात अडकला. त्याला लेबर कॅम्पमध्ये आश्रय कोणी दिला, याचा छडा पोलीस लावत आहेत.

वेगवेगळी नावे लावून पोलिसांना दिला गुंगारा

शहजाद हा वेगवेगळी नावे लावून मागील तीन दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. सध्या तो विजय दास या नावाने फिरत होता. घोडबंदरच्या कासारवडवली येथील लेबर पॅम्प परिसरात त्याचे वास्तव्य असल्याचे पोलिसांना मोबाईल टॉवरच्या लोकेशनवरून समजले होते. काही वर्षांपूर्वी तो हिरानंदानी परिसरात मजूर म्हणून काम करीत होता.

सर्व मजुरांची मध्यरात्री एका रांगेत झाडाझडती!

शहजादने मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे तीन दिवस त्याचा ठावठिकाणा नव्हता. पोलिसांनी आजूबाजूचे जंगल पिंजून काढले होते. लेबर कॅम्पमध्ये राहणाऱया सर्व मजुरांना मध्यरात्री बाहेर काढून एका रांगेत पोलिसांनी उभे केले होते आणि प्रत्येकाची झाडाझडती घेतली होती. याचवेळी एक टीम शहजाद आजूबाजूला कुठे लपून बसलाय काय, याचा शोध घेत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील ट्रायडेंट हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील ट्रायडेंट हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ
Mumbai Trident Women Dead Body : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध ट्रायडेंट हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची...
“तुमच्यामुळे आमची सुरक्षा धोक्यात”; करीना कपूरची पापाराझींना थेट वॉर्निंग
Saif Ali Khan ला पोलीस विचारणार ‘हे’ 9 प्रश्न, समोर येणार मोठं सत्य? तुम्हीही जाणून घ्या
‘आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही…’; प्राजक्ता माळीचं चाहत्यांना आवाहन
“सैफवर हल्ला करणं सोपं होतं”, सैफचा हल्लेखोर राष्ट्रीय कुस्तीपटू? मुंबई पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर
रात्री औषध घेऊन झोपले अन् सकाळी उठलेच नाहीत..; ‘हिरवं कुंकू’ फेम योगेश महाजन यांचं निधन
बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने भोगला तुरुंगवास; म्हणाली, ‘ते 15 दिवस मी फक्त…’