‘ब्लॅक’च्या सेटवर लादी पुसली, शिव्याही खाल्ल्या.. आज हाच अभिनेता आहे कोट्यावधींचा मालक
हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टारचा दर्जा फार कमी लोकांना मिळू शकतो. पण ज्या व्यक्तीवर हा सुंदर टॅग लावला जातो तो पूर्णपणे वेगळा आहे. चॉकलेट बॉय पण तितकाच उत्तम अभिनेता अशी ओळख असलेल्या या कलाकाराने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. एक काळ असा होता की त्याने चित्रपटाच्या सेटवर लादीही पुसली आहे आणि वेळप्रसंगी शिव्याही खाल्ल्यात. पण आज तोच आज एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि कोट्यवधींची संपत्ती त्याच्याकडे आहे. त्याने अनेक उत्तम चित्रपटांत अभिनयाचं नाणं खणखणीत वाजतवत स्वत:ला सिद्धही केलं. फिल्मी
बॅकग्राऊंड असूनही त्याने बरीच मेहनत केली अभिनेता म्हणूजे रणबीर कपूर.. तरूणाईच्या गळ्यातला ताईत असलेल्या रणबीरने एकेकाळी सेटवर लादीही पुसली आहे. जाणून घेऊया तो किस्सा..
रणबीर कपूरने दहावीची परीक्षा संपल्यानंतर पहिल्यांदाच ‘आ अब लौट चलें’च्या सेटवर काम केले. हा चित्रपट रणबीरचे वडील ऋषी कपूर यांनी दिग्दर्शित केला होता आणि रणबीरने या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो फिल्म मेकिंगचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला गेला , तिथे त्याने शॉर्ट फिल्म्सही बनवल्या.
सेटवर लादीही पुसली
एका मुलाखतीदरम्यान खुद्द रणबीर कपूरने खुलासा केला होता की, 2005 मध्ये जेव्हा तो मुंबईत परतला तेव्हा अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटात रणबीर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. “मी 21 तास सेटवर काम करायचो. मी सेटवर मॉपिंगपासून लाईट फिक्सिंगपर्यंत सगळं काम केलं आहे. वेळप्रसंगी मी शिव्याही खाल्ल्या आहेत, पण मी दररोज काही ना काही शिकत होतो. माझा एकच उद्देश होता की भन्साळी सरांनी मला त्यांच्या एका चित्रपटात लीड रोल ऑफर करावा ” अशी आठवण रणबीरने सांगितली होती.
रणबीर कपूरने 2007 मध्ये ‘सावरिया’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण रणबीरचा टॉवेल सीन प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र, या चित्रपटासाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट पदार्पण ( पुरूष) श्रेणीत पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील त्याची भूमिका ही त्याचे आजोबा राज कपूर यांच्या ‘आवारा’ मधील भूमिकेसाठी ट्रिब्युट होता, असं रणबीरने सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा बचना ए हसीनों हा चित्रपट रिलीज झाला, तो फारसा चालला नाही. पण 2009 साली आलेल्या ‘वेक अप सिड’ चित्रपटाने रणबीर कपूरला अभिनेता म्हणून एक नवी ओळख मिळवून दिली, त्याच्या कामाचे खूप कौतुक झालं. त्यानंतर मात्र त्याच्या करिअर सुसाट सुटलं, बर्फी, ये जवानी है दीवानी, रॉकस्टार, संजू, ॲनिमल असे त्याचे चित्रपट खूप गाजले.
रणबीरचे नेटवर्थ
नेट वर्थबद्दल बोलायचे झाल्यास, लाइव्ह मिंटनुसार, रणबीर कपूर 345 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. एका चित्रपटासाठी तो 50 कोटी रुपये आकारतो. रणबीरच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएल, रेंज रोव्हर, ऑडी आरएस 7, लँड क्रूझर, रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू एक्स 6 सारख्या उत्कृष्ट कार आहेत. वांद्रे येथे तो ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्याची किंमत 35 कोटी रुपये आहे, याशिवाय त्याचे पुण्यात 13 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List