“सैफवर हल्ला करणं सोपं होतं”, सैफचा हल्लेखोर राष्ट्रीय कुस्तीपटू? मुंबई पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर

“सैफवर हल्ला करणं सोपं होतं”, सैफचा हल्लेखोर राष्ट्रीय कुस्तीपटू? मुंबई पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या मध्यरात्री एका चोराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सहा वार करण्यात आले. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला हल्ल्याच्या 32 तासांनी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.

हल्ल्याच्या संध्याकाळी हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं हल्लेखोराचं नाव आहे. बारीक शरीरयष्टी असलेला 30 वर्षांचा हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्याचा चेहरा देखील यात दिसला.

बारीक शरीरयष्टी असलेला चोराने  सैफवर हल्ला कसा केला?

मात्र जेव्हा त्या चोराचा चेहरा समोर आला तेव्हा त्याच्याकडे पाहून तो सैफवर हल्ला कसा करू शकतो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं. मात्र पोलीस तपासात याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी शहजादने तो कुस्तीपटू असल्याचा खुलासा केला आहे. सैफवर हल्ला करणं त्याच्यासाठी कसं सोपं होतं याचा खुलासा त्याने केला आहे.

शहजादला सैफवर हल्ला करणं कसं सोपं गेलं?

अभिनेता सैफ अली खान वयाच्या साठीतही फिट आहे. त्याच्या भरभक्कम शरिरासमोर बारीक अंगकाठी असलेला शहजाद त्याला रक्तबंबाळ करून गेला. बारीक अंगकाठी असलेल्या शहजाद समोर सैफची शक्ती कमी कशी पडली असा प्रश्न अनेकांना पडला होता. शहजाद हा कुस्तीपटू असल्याने तो सैफवर वार करू शकला असं त्याने म्हटलं आहे.

शहजाद राष्ट्रीय कुस्तीपटू

मुंबई पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शहजाद हा मुळचा बांग्लादेशी असून तो तिथला कुस्तीपटू आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धा खेळल्या आहेत. कमी वजन असलेल्या गटात तो कुस्ती खेळत होता. बेरोजगारीमुळे तो भारतात आला, असं त्याने सांगितलं.

“मी चपळ आणि लवचिक”  हल्लेखोरानं म्हटलं

सैफवर समोरून वार करणं शक्य नव्हतं म्हणून सैफ अली खानवर मागून हल्ला केला असं त्याने म्हटलं. शहजाद म्हणाला, “मी खूप चपळ आहे. मी खेळाडू आहे. मी जिल्हास्तरीय कुस्तीपटू आहे. बांग्लादेशच्या राष्ट्रीय पातळीवर कुस्तीस्पर्धा खेळलो आहे. अनेक वर्ष कमी वजनाच्या वर्गवारीत कुस्ती खेळल्याने माझं शरीर चपळ आणि लवचिक आहे. त्यामुळे मी छोट्या जागेतून आत शिरणं, उड्या मारण्यात सक्षम आहे त्यामुळे मी हे करू शकलो”, असं त्याने सांगितलं.

पोलीस हल्ल्याचा सीन रिक्रिएटर करणार

शहजाद शहाजाद याने पोलीस चौकशीत दिलेल्या या सगळ्या माहितीची पोलीस शहानिशा करणार आहेत. हल्ल्याचा सीन रिक्रिएट करताना शहजादकडून या सगळ्या गोष्टी पुन्हा करून घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे शहजाद बांग्लादेशमधून भारतात कसा आला? तो खरंच कुस्तीपटू आहे का? याच्यामागे कोणाचा हात होता? मुंबईतील काही लोक याच्यामागे आहेत का? कोणीकोणी त्याला मदत केली? या सगळ्याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

सध्या सैफची प्रकृती सुधारत असून त्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.पण या हल्ल्यामुळे नक्कीच सेलिब्रिटींच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप? मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप?
मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा...
शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट आहे, पडद्यामागे काय होतायत हालचाली
“होय, मीच तो..”; सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांसमोर कबुली, सांगितलं सर्व सत्य
महिमा चौधरीच्या मुलीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, 17 व्या वर्षी दिसते आईपेक्षा उंच, तिला पाहून म्हणाल…
प्राजक्ता माळीनंतर तेजश्री प्रधानही थेट आश्रमाच्या वाटेवर; पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का
‘ब्लॅक’च्या सेटवर लादी पुसली, शिव्याही खाल्ल्या.. आज हाच अभिनेता आहे कोट्यावधींचा मालक
युजवेंद्रकडून धनश्रीने केलीये पोटगीची मागणी? रक्कम ऐकून भुवया उंचावतील