दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर शिवसैनीकांचा शिवसेना भवनात दणदणीत निर्धार मेळावा

दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर शिवसैनीकांचा शिवसेना भवनात दणदणीत निर्धार मेळावा

कोणीही पक्ष सोडणार नाही. एखाद्या पराभवाने शिवसैनिक खचून जाणारे नाहीत. पुन्हा जोमाने कामाला लागून संघटना पुन्हा मजबूत स्थितीत उभारुन दापोली विधानसभा मतदारसंघातील या पुढील प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवूनच दाखवू, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना भवन, मुंबई येथील आयोजित निर्धाळ मेळाव्यात व्यक्त केला.

दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धाळ मेळावा शनिवारी 18 जानेवारी 2025 रोजी पार पडला. या मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख संजय कदम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत झालेला हा पराभव काही अंतिम पराभव नाही. पैसा आणि ईव्हीएम छेडछाड याचा तो पराभव आहे. धनशक्तीला शिवसेना या चार नावाच्या शब्दाने प्रतिकुल परिस्थितीही अखेरपर्यंत झुंजवले. हे फक्त शिवसेनाच करू शकते. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची विचाराधारा घेऊन पुढे मार्गक्रमण करणाऱ्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचारच देश हितासह राज्याची प्रगती करू शकतात, याची केवळ शिवसैनिकांनाच नव्हे तर विरोधी पक्षातील सर्वानाच खात्री आहे. ही बाब लक्षात घेता शिवसेने शिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभव हा काही आपला तसेच आपल्या शिवसेनेचा अंतिम पराभव नाही. हे ही दिवस निघून जातील पुढील सर्व दिवस हे शिवसेनेचे अर्थातच शिवसैनिकांचेच आहेत. त्यामुळे झाला पराभव विसरून पुन्हा सर्वानी झटून काम करुन शिवसेनेला उभारी आणून चांगले दिवस आणुयात, अशा प्रकारचा निर्धार संजय कदम यांनी व्यक्त केला.

शिवसेना भवन दादर येथे पार पडलेल्या या दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना निर्धार मेळाव्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम, दापोली विधानसभा संपर्कप्रमुख सचिन पाटील, खेड गुहागर तालुका संपर्क संघटक ज्योती भोसले, दापोली मंडणगड तालुका संपर्क संघटीका स्नेहल महाडीक, दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, सहसंपर्कप्रमुख सुहास खोकरे, दापोली तालुका संपर्कप्रमुख रविंद्र धाडवे, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, मंडणगड तालुका संपर्कप्रमुख महेश गणवे, मंडणगड तालुका संघटक विनायक चोरगे आदि मान्यवरांसह दापोली विधानसभा मध्यवर्ती मुंबई कार्यकारिणीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहराने पटकावली ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी; मिळाले तब्बल इतके लाख रुपये Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहराने पटकावली ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी; मिळाले तब्बल इतके लाख रुपये
‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून करणवीर मेहराने विजेतेपद पटकावलं आहे. 105 दिवसांच्या खेळानंतर अखेर या सिझनचा...
Bigg Boss winner: कुठे आणि कोणत्या स्थितीत आहे ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनचा विजेता? शो जिंकूनही करिअर फ्लॉप
Bigg Boss 18 Winner – करणवीर मेहरा ठरला बिग बॉसचा विजेता, विवियन डिसेना उपविजेता
Bigg Boss 18 Winner LIVE: इजिप्तमध्ये लग्न, ख्रिश्चन असताना इस्लाम धर्म स्वीकारला; कलर्सचा प्रिय विवियन डिसेना विजेता?
Bigg Boss 18: काम्याने फिनालेच्या आधीच ‘या’ स्पर्धकाला ठरवलं विजेता; कोण आहे तो?
Bigg Boss 18 Winner LIVE: 3 गर्लफ्रेंड, बिग बॉस 18 शोमध्ये ईशासोबत रोमान्स; कोण आहे कंटेस्टेंट्स अविनाश मिश्रा?
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, महायुतीतील वाद चव्हाट्यावर