आमिर खानचा लहान भाऊ जगतोय असं आयुष्य, बॉलिवूडमध्ये नाही मिळालं यश, घेतला मोठा निर्णय
अभिनेता आमिर खान बॉलिवूड विश्वातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार आहे. पण अभिनेत्याचा भाऊ फैजल खान याला कदाचीत कोणी ओळखत असेल. फैजल खान याने 1969 मध्ये बालकलाकार म्हणून पहिल्यांदा सिनेमात काम केलं. सिनेमाचं नाव ‘प्यार का मौसम’ असं होतं. सिनेमात फैजल याने अभिनेते शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. ‘प्यार का मैसम’ सिनेमानंतर फैजल अभिनेता आमिर खान याच्यासोबत ‘मेला’ सिनेमात झळकला. पण आता अभिनेता अत्यंत साधं आयुष्य जगत आहे.
फैजल खान इंडस्ट्रीमध्ये त्याच्या भावाप्रमाणे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवू शकला नाही. पण त्याने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं. 1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ सिनेमात फैजल याने खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला. तर आमिर मुख्य भूमिकेत होता. ‘मेला’ सिनेमात देखील फैजल याने उत्तम भूमिका साकारली. पण त्याला बॉलिवूडवर राज्य करता आलं नाही.
आमिर खानचा भाऊ फैजल देखील सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मेला सिनेमात दिसला होता. या सिनेमात भयंकर खलनायकापासून ते ॲक्शन, गाणी आणि नाटक असं सर्व काही होतं, परंतु रिलीजनंतर हा सिनेमा फ्लॉप ठरला. या सिनेमाच्या अपयशामुळे निर्मात्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडचा निरोप घेतला.
सांगायचं झालं तर, फैजल खान आज देखील ‘मेला’ सिनेमामुळे चाहत्यांच्या लक्षात आहे. सिनेमात त्याने शंकर या भूमिकेला न्याय दिला होता. पण भूमिकेचा फैजलच्या करियरला कोणताच फायदा झाला नाही. फैजल याच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, तो निर्माते ताहिर हुसैन यांचा मुलगा आहे. अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. पण फैजल इंडस्ट्रीपासून दूर स्वतःचं खासगी आयुष्य जगत आहे.
फैजल खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, फक्त 6 – 7 सिनेमांमध्ये अभिनेत्याने काम केलं असेल. पण कोणताच सिनेमाच्या त्याच्या करियरसाठी महत्त्वाचा ठरला नाही. अखेर अभिनेत्याने बॉलिवूडचा निरोप घेतण्याचा निर्णय घेतला. पण अभिनेता आमिर खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आमिर खानच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List