“महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे..”; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रसिद्ध गायकाला कायदेशीर नोटीस

“महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे..”; वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रसिद्ध गायकाला कायदेशीर नोटीस

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि बिनधास्त मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. मात्र यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीत यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील वकील असिम सरोदे यांनी त्यांचे क्लाएंट मनिष देशपांडे यांच्या वतीने अभिजीत भट्टाचार्य यांना नोटीस पाठवली आहे. महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अभिजीत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात फौजदारी खटला करण्यात येणार असल्याचा इशारा या नोटिशीतून देण्यात आला आहे.

एका पॉडकास्ट मुलाखतीत भट्टाचार्य यांनी महात्मा गांधींना भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधींपेक्षाही मोठे होते, असं ते म्हणाले. आरडी बर्मन हे संगीत विश्वातील भारताचे राष्ट्रपिता होते, तर महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, असं वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य यांनी केलं होतं.

“महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत हा पूर्वीपासूनच अस्तित्वात होता, नंतर भारतापासून पाकिस्तान वेगळं झालं. गांधींना चुकून भारताचे राष्ट्रपिता म्हटलं गेलंय. पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी तेच जबाबदार होते”, असं मत अभिजीत यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांचं हे मत सर्वसामान्यांची दिशाभूल करणारं आणि अनादर करणारं असल्याचं म्हणत काहींनी निषेध व्यक्त केला.

अभिजीत यांनी त्यांच्या या वक्तव्यासाठी लेखी माफीनामा सादर नाही केला तर त्यांच्यावर फौजदारी खटला सुरू करण्याचा इशारा असिम सरोदेंनी केला. ‘महात्मा गांधींमुळे राष्ट्र म्हणून भारताची जागतिक स्तरावर ओळख आहे. तुमच्या या वक्तव्यामुळे महात्मा गांधींच्या प्रतिष्ठेला कलंक लागला असून त्यांची बदनामी झाली आहे’, असं सरोदे यांनी नोटिशीत म्हटलंय.

“भारत आधीपासूनच अस्तित्वात होतं आणि पाकिस्तानची निर्मिती चुकून झाली, असा दावा करत तुम्ही मूर्खपणाचं वक्तव्य केलंय. या वक्तव्यातून तुमच्या मनात महात्मा गांधींबद्दल द्वेष असल्याचं दर्शवतंय. या वक्तव्यासाठी तुम्ही औपचारिक माफी मागितली नाही तर तुमच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेतील कलम 353, 506 अंतर्गत तक्रार दाखल केली जाईल”, अशी नोटीस अभिजीत यांना पाठवण्यात आली आहे. या नोटिशीवर अद्याप अभिजीत यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बिग बॉस 18 च्या ट्रॉफीची सर्वत्र चर्चा;काय खास आहे या ट्रॉफीमध्ये? सिद्धार्थ शुक्लासोबत लावलं जातंय कनेक्शन बिग बॉस 18 च्या ट्रॉफीची सर्वत्र चर्चा;काय खास आहे या ट्रॉफीमध्ये? सिद्धार्थ शुक्लासोबत लावलं जातंय कनेक्शन
Bigg Boss 18: लोकप्रिय शो ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर रात्री 9.30 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज...
AI मुळे शत्रुघ्न सिन्हा सोशल मीडियावर ‘खामोश’; सैफ अली खानला समर्थन देताना बॉलिवूडच्या छेनू ने केली ही चूक
गुरुवारी रात्री सैफ अली खानच्या घरी नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली A टू Z माहिती
Skincare Oil: कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात? झोपण्यापूर्वी ‘या’ तेलाचा वापर ठरेल फायदेशीर…
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांवरून ओळखा लिव्हर झालेय खराब, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
Santosh Deshmukh Case – ‘सगळ्या आरोपींना फाशी द्यावी’, देशमुख कुटुंबियांची मागणी
Sindhudurg News – अवैध वाळू उपसाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, साखळी उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच