Saif Ali Khan Attack : म्हणून शाहरुख, सलमानच्या घरफोडीचा प्रयत्न फसला, हल्लेखोराने ‘या’ कारणामुळे निवडलं सैफचं घर
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोर घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला होता. या घटनेनंतर 4 दिवसांनी मुंबई पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. मोहम्मद शहजाद उर्फ विजय दास असे या आरोपीचे नाव असून त्याला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशू सुरू केली असून त्यातून बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजादने अनेक सेलिब्रेटींच्या घरांची रेकी केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक सेलिब्रेटींच्या घराची रेकी त्याने केली होती.
आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असून त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीतून हे सर्व खुलासे होताना दिसत आहेत. त्याने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक घरांची रेकी करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे. एका रिक्षातून प्रवास करताना त्याने रिक्षाचालकाकडून हे सेलिब्रिटी कुठे कुठे राहतात, तसेच त्यांच्या घराबद्दलची माहिती मिळवली होती. सगळ्या घरांची माहिती मिळवल्यानंतर अभिनेता सैफ अली खानचे घर आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचे वाटल्याने आरोपीने हे घर निवडले.
मुलाला ओलीस ठेवून मागणार होता पैसे
एवढेच नव्हे तर सैफच्या घरात घुसल्यानंतर त्याचा छोटा मुलगा जहांगीर उर्फ जेह याला ओलीस ठेवून तिथल्या तिथे पैशांची मागणी करत मोठी रक्कम वसूल करायची आणि तिथून फरार व्हायचं असा आरोपीचा डाव होता. मात्र घटनेच्या रात्री घरात घुसल्यावर घरातील इतर सव्रचजण जागे झाले, त्यांनी आरोपीला घेरल, त्यामुळे तो घाबरला. आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीने अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली. याचवेळी सैफ अली खानवर एकूण 6 वार आरोपीने केली आणि तिथून फरार झाला.
आत्तापर्यंतचच्या तपासात या सर्व बाबी निष्पन्न झाल्या असून तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आरोपीला अटक करण्यात आली. हा आरोपी पुन्हा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होता, मात्र तिथे परत जाण्यासाठी त्याला बनावट पासपोर्ट, इतर कागदप्तर तयार करायची होती. त्यासाठी तो पैशांची व्यवस्था करत होता अशीही माहिती समोर आली आहे. आरोपीच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List