पंतप्रधान मोदी संविधान फेकून देणार होते, पण जनतेमुळे नमस्कार करावा लागला; राहुल गांधी यांचा घणाघात
आज कुठल्याही आमदार, खासदाराकडे सत्ता नाही अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी संविधान फेकून देणार होते, पण जनतेमुळे नमस्कार करावा लागला असा घणाघात राहुल गांधी म्हणाले.
पाटण्यात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही मला सांगा ती या संविधानात कुठे लिहिलंय की देशाची सर्व संपत्ती ही फक्त दोन ते ती लोकांच्या हातात असली पाहिजे. पंतप्रधान मोदी जेव्हा संसदेत आले तेव्हा म्हणाले की 400 जागा आल्या तर आम्ही संविधान बदलून टाकू. पण जेव्हा आपण सगळ्यांनी मिळून त्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले तेव्हा निवडणुकीनंतर पहिल्याच दिवशी मोदींनी संविधानाला नमस्कार केला. पण त्यांची इच्छा होती की संविधानाला फेकून देऊ. पण हिंदुस्थानची जनता म्हणाली की जर तुम्ही संविधानाला नमस्कार नाही केला तर आम्ही तुम्हाला फेकून देऊ. त्यामुळे पंतप्रधानांनी संविधानाला नमस्कार केला आणि आपलं काम सुरू केलं असे राहुल गांधी म्हणाले.
तसेच तुम्ही प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला. तुम्ही म्हणालात की राजकीय प्रतिनिधीत्व असलं पाहिजे. आज भारतात आमदार आणि खासदाराकडे कुठलीही सत्ता नाही. संसदेत भाजपचे दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाचे खासदार भेटतात. आम्हाला पिंजऱ्यात कैद केले आहे असे भाजपचे खासदार सांगतात असेही राहुल गांधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List