Delhi Election 2025 – अरविंद केजरीवाल यांच्या डॉक्युमेंट्रीवर डाका! ‘आप’चा भाजपवर मोठा आरोप
ऐन कडाक्याच्या थंडीत विधासभा निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकारण तापले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचार सुरू आहे. अशातच आता आम आदमी पार्टीने डॉक्युमेंट्रीवरून भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर बनवण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग रोखण्यात आले आहे. अनब्रेकेबल नावाने ही डॉक्युमेंट्री बनण्यात आली आहे. पण दिल्ली पोलिसांनी डॉक्युमेंट्रिच्या स्क्रिनिंगला परवानगी दिली नाही, असा दावा डॉक्युमेंट्रिच्या निर्मात्याने केला आहे.
अनब्रेकेबल या डॉक्युमेंट्रेचे स्क्रिनिंग शनिवारी 12 वाजता दिल्लीतील प्यारेलाल भवनमध्ये आयोजित केले होते. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिषी याही या स्क्रिनिंगला उपस्थित राहणार होत्या. ही डॉक्युमेंट्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवल्याने आणि ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच्या कहाणीवर बनवण्यात आली आहे.
डॉक्युमेंट्रिच्या स्क्रिनिंगवरून भाजपने दिल्लीच्या थिएटर मालकांना धमक्या दिल्या आहेत. स्क्रिनिंग रोखण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. भाजपच्या सांगण्यावरूनच दिल्ली पोलिसांनी डॉक्युमेंट्रिच्या स्क्रिनिंगला परवानगी दिली नाही, असा आरोप ‘आप’ नेत्यांनी केला आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही डॉक्युमेंट्री दाखवणारच, भाजप रोखू शकत नाही, असे ‘आप’ने म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. तीन महिन्यांनी म्हणजे जून 2024 मध्ये ते जामिनावर बाहेर आले होते. केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी आणि तुरुंगातून बाहेर आले, यावर ही डॉक्युमेंट्री आहे. याच प्रकरणात ‘आप’ चे दोन बडे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यावरही ईडीने कारवाई केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List