रत्नागिरी शहरातून बांगलादेशी महिला ताब्यात; पोलिसांकडून आणखी एक कारवाई
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे एक महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त प्रयत्नाने एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले. ही महिला गेली ४ ते ५ वर्षे रत्नागिरीत राहत होती. आणि तिथे घरकाम करून आपल्या पती सोबत उदरनिर्वाह करत होती . तीचा पती रत्नागिरीतच दुकान चालवून संसाराला हातभार लावत होता.
रत्नागिरीतील शिरगावमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला रहिवाशी प्रमाणपत्र ताजे असताना हि कारवाई करण्यात आली. या बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यामागील कारण म्हणजे तिच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त टीमने या महिलेची ओळख पटवून आणि तिच्या नागरिकत्वाची चौकशी केल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रत्नागिरी शहर पोलीस आणि एटीएसच्या सखोल चौकशीनंतर झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List