Saif Ali Khan Attack : अब्बूंवरील हल्ल्याने हादरला, सैफच्या लेकाने घेतला मोठा निर्णय
अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोर घुसून त्याने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता त्याची प्रकृती बरी असून आयसीयूमधून स्पेशल रूममध्येही शिफ्ट करण्यात आले. सैफ अली खानसोबत घडलेल्या या घटनेमुळे इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सची चिंता वाढली आहे. सैफ अली खानसोबत हे घडू शकतं, मग कुणासोबतही होऊ शकतं, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. मात्र सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी मध्यरात्री एक अज्ञात व्यक्ती सैफ-करीनाच्या घरात घुसरी, केअरटेकरशी वाद घालतलत्याने कोटी रुपये मागितले. सैफने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. सैफला 6 जखमा झाल्या, बराच रक्तस्त्रावही झाला. अखेर लीलावतीमध्ये त्याल दाखल करण्यात आले.
मात्र त्याच्यावरील या हल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला असूस सैफची मुलंही हादरली आहेत. याचदरम्यान सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने आता मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. सैफची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्याचे कुटुंबीयही त्याची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्याला रुग्णालयात भेटायला येत आहेत. इब्राहिमही हॉस्पिटलबाहेरही अनेकदा स्पॉट झाला होता.
वडिलांवरील हल्ल्यानंतर इब्राहिमचा मोठा निर्णय
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, 16 जानेवारी 2025 रोजी सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर इब्राहिम अली खानने आपल्या प्रोजेक्टचे शूटिंग थांबवले आहे. सध्या इब्राहिम त्याचा पहिला चित्रपट ‘दिलेर’वर काम करत होता. मात्र अब्बू, सैफसोबत घडलेल्या या घटनेने तो हादरला आहे. अशा परिस्थितीत त्याने अखेर या चित्रपटाचे शूटिंग स्थगित केले होते. मात्र, आता सैफ अली खान पूर्णपणे धोक्याबाहेर असून तो बरा होत असल्याने इब्राहिम लवकरच शूटिंगवर परतू शकतो, अशी चर्चा आहे.
सैफला एक आठवडा आरामाचा सल्ला
सैफ अली खानच्या तब्येतीचे अपडेट काल लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले. तो आता बरा असल्याचे सांगितले होते. जर चाकू 2 मिमीने आत गेला असता तर परिस्थिती आणखी बिघडली असती, असे त्यांनी नमूद केलं. सैफच्या पाठीतून काढण्यात आलेल्या चाकूचा फोटोही समोर आला आहे. चाकूचा एक तुटलेला तुकडा डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाहेर काढला. हल्लेखोराने किती तीव्रतेने वार केला हे त्यावरून स्पष्ट होत आहे. सैफला आता आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट केले असले तरी आठवडाभर बेड रेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
करीनाचा जबाब नोंदवला
सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस देखील याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. अनेकांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्री आणि सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर हिचा देखील जबाब नोंदवला आहे. करीना कपूर हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘हल्लेखोर घरात आला. हाणामारी झाली तेव्हा हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता. हल्लेखोरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्ही संपूर्ण खान कुटुंब 12 व्या मजल्यावर पोहोचलो…’ असे तिने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List