10000000000 रुपये सुरक्षा वर कोण करतोय खर्च…टाइट सिक्योरिटीनंतर सैफ, सलमान-शाहरुख कसे अनसेफ?
Saif Ali Khan Attacked: बॉलीवू़ड स्टार सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहत्या घरात गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. बॉलीवूड स्टार सुरक्षेवर मोठा खर्च करत आहे. सैफ अली खान, सलमान खान, शाहरुख खान यांच्या सुरक्षेवर मोठा खर्च होत आहे. त्यानंतर त्यांच्यासह सर्वच स्टार अनसेफ का आहेत?
लाइफस्टाइल अशियानुसार, सैफ अली खान आणि त्यांची पत्नी करीना कपूर खान परिवारासोबत वांद्रे येथील सतगुरु शरण अपार्टमेंटमध्ये राहतात. हे घर प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर दर्शिनी शाह यांनी डिजाइन केले आहे. सैफ अली खान ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात, त्या बिल्डींमधील 3BHKफ्लॅटची किमत 10 कोटी पेक्षा जास्त आहे. सैफ यांच्या अपार्टमेंटची किंमत 55 कोटी असल्याचे सांगितले जाते.
सैफ अली खान यांच्या घरी 24 तास सुरक्षा
सैफ अली खान यांच्या अपार्टमेंटमध्ये सिक्योरिटी 24 तास राहते. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहे. सैफ याच्या घरात परवानगीशिवाय कोणालाही जात येत नाही. काही रिपोर्टसमध्ये सैफ अली खान याच्या परिवाराच्या सुरक्षेत लाखो रुपये खर्च होतात. तसेच त्यांच्याकडे प्रायव्हेट बॉडी गार्ड आहे. ते नेहमी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. हे सर्व असूनही सैफ यांच्या घरातील सुरक्षा व्यवस्था कशी भेदली? हा मोठा प्रश्न आहे.
कोणत्या बॉडीगॉर्डला किती पॅकेज
रवी सिंह हा एक दशकापासून जास्त काळ शाहरुख खानवर सोबत बॉडीगार्ड आहे. त्याला 2.7 कोटी वर्षीक पॅकेज आहे. इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक पगार घेणारा तो बॉडीगार्ड आहे. गुरमीत सिंह जॉली उर्फ शेरा हा 1995 पासून सलमान खान याच्या बॉडीगार्ड आहे. त्याला 2 कोटी रुपये पॅकेज आहे. युवराज घोरपडे हा आमिर खान याचा सुरक्षा रक्षक आहे. त्यालाही 2 कोटींचे पॅकेज आहे. पोलीस कॉस्टेबल जितेंद्र शिंदे याने 2015 ते 2021 दरम्यान अमिताभ बच्चन याचे बॉडीगार्ड म्हणून काम केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला त्यावेळी 1.5 कोटी पॅकेज होते. अक्षय कुमार याचा बॉडीगार्ड श्रेयसे थेले याला 1.2 कोटींचे पॅकेज आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List