Budget 2025 – अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया; शेतकरी कर्जमाफी, हमीभावावर काहीच नाही – नाना पटोले

Budget 2025 – अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया; शेतकरी कर्जमाफी, हमीभावावर काहीच नाही – नाना पटोले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र मोठमोठे दावे करुनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही. या बजेटने गुंतवणूकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकाचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदद्लही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया व गोलमाल आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. आज देशातील शेतकरी संकटात आहे, शेतमालाला हमी भाव द्यावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत पण अर्थसंकल्पात त्याबाबत चकार शब्दही नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत असताना भाजपा सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये केल्याने शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, रोजगार निर्मितीबद्दल काहीच ठोस नियोजन दिसत नाही. आयकरात 12 लाख रुपयांपर्यत कर नाही अशी घोषणा केली आहे पण त्यातही गोंधळ आहे. नोकरदार व मध्यमवर्गिंयाना फायदा द्यावा यासाठी आयकर मर्यादा वाढवण्यामागे लोकसभेला 400 पारचा रथ थोपवून 240 वर थांबवल्याने ही घोषणा करावी लागल्याचे दिसत आहे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

ग्रामीण भागात गरिबांना हक्काचा रोजगार देणाऱ्या मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याऐवजी निधीत कपात केली आहे. आरोग्य व शिक्षण या दोन महत्वाच्या क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कोणतीच भरीव तरतूद दिसत नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन 2014 साली दिले होते पण मागील 11 वर्षात रोजगार तर दिले नाहीतच उलट 45 वर्षातील सर्वात प्रचंड बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व नोकऱ्यांसदर्भात ठोस धोरण नाही. सर्वसामान्य जनतेला घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सवलत दिलेली नाही, जीएसटी कमी केलेला नाही, एकूणच आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केला आहे, असे पटोले म्हणाले.

अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख सातत्याने करण्यात आला पण महाराष्ट्रासह इतर कोणत्याच राज्याचा उल्लेख केलेला नाही. बिहारमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये बिहारचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेच शेअर बाजाराने नकारात्मक प्रतिसाद दिला याचा अर्थ या अर्थसंकल्पाने अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत हे स्पष्ट होत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. त्याबद्दल राज्याचे...
पैसे उरले तर मला द्या… बॉलिवूडमध्येही हवा करणाऱ्या अभिनेत्याचं मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्युशन
कोल्डप्ले सिंगर ख्रिस मार्टिन पोहोचला महाकुंभात; गर्लफ्रेंडसोबत संगमामध्ये डुबकी अन्…
सैफचा लेक इब्राहिमच्या पहिल्या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने चाहत्यांची मनं जिंकली; मात्र खुशी कपूरमुळे नाराजी
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात 5 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद
रत्नागिरीत स्मार्ट मीटर जाळून आंदोलन करणार; माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा
Maghi Ganeshotsav – आंजर्ले कड्यावरील श्रीगणपती देवस्थानचा माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा