विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून महिलेची विवस्त्र मिरवणूक काढली; 12 जणांना अटक

विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून महिलेची विवस्त्र मिरवणूक काढली; 12 जणांना अटक

विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून महिलेला विवस्त्र करून गावातून मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. आरोपींनी महिलेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यानंतर पोलिसांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये येत आरोपींवर कारवाई केली.

गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील ढलसीमल गावात ही खळबळजनक घटना घडली. एका विवाहित महिलेचे गावातील व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून सासरच्या मंडळींनी तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. मग विवस्त्र करून साखळदंडाने मोटारसायकलला बांधून तिची मिरवणूक काढण्यात आली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.

महिलेचा पती सध्या हत्येच्या गुन्ह्यात राजकोटमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गुजरात पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत 12 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये पीडितेचे सासरे, सासू, मेहुणे, पुतणे, नणंद आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

आोरपी महिलांना न्यायालयीन कोठडीत तर चार पुरूष आरोपींना चौकशीसाठी पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. तर चार अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. याशिवाय अन्य तिघांची गुन्ह्यातील भूमिका पोलीस तपासत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. त्याबद्दल राज्याचे...
पैसे उरले तर मला द्या… बॉलिवूडमध्येही हवा करणाऱ्या अभिनेत्याचं मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्युशन
कोल्डप्ले सिंगर ख्रिस मार्टिन पोहोचला महाकुंभात; गर्लफ्रेंडसोबत संगमामध्ये डुबकी अन्…
सैफचा लेक इब्राहिमच्या पहिल्या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने चाहत्यांची मनं जिंकली; मात्र खुशी कपूरमुळे नाराजी
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात 5 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद
रत्नागिरीत स्मार्ट मीटर जाळून आंदोलन करणार; माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा
Maghi Ganeshotsav – आंजर्ले कड्यावरील श्रीगणपती देवस्थानचा माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा