संध्याकाळ होताच अंग थरथर कापतं? तुम्हाला सनसेट एंग्झायटी तर नाही?; जाणून घ्या डिटेल्स

संध्याकाळ होताच अंग थरथर कापतं? तुम्हाला सनसेट एंग्झायटी तर नाही?; जाणून घ्या डिटेल्स

कोरोना संक्रमणानंतर माणसाच्या जीवनशैलीत बरेच बदल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. त्यात एंग्झायटीच्या रुपाने एक नवीनच डोकेदुखी उभी राहिली आहे. आज भारतात जास्तीत जास्त लोक एंग्झायटीची शिकार झाले आहेत. या आजारात व्यक्ती मानसिक आणि शारीरिक रुपाने प्रचंड विचार करतात, स्वत:ची प्रचंड चिंता करतात, त्यांना घाबरल्या सारखं होतं, भीती वाटते आणि तणाव निर्माण होतो.

एकवेळ अशी येते की आजारी व्यक्ती पूर्णपणे हताश, निराश आणि हतबल होतो. कुटुंबातील लोकांशी बोलायलाही त्याला भीती वाटते. त्याला एकांतात राहायला आवडतं. एंग्झायटीचे अनेक प्रकार आहेत. पण बहुतेक लोकांना सूर्यास्त झाल्यावर एंग्झायटीचा त्रास सुरू होतो. संपूर्ण रातभर त्यांना हा त्रास होतो. जस जसा सूर्य कलतो आणि अंधार पसरू लागतो, त्यावेळी आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होते. एंग्झायटीने त्रस्त असलेल्या व्यक्तीला आयुष्य संपवावसं वाटतं. अशा परिस्थितीत रुग्णाने तात्काल डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे.

सूर्यास्तानंतरची लक्षणे

कोव्हिडनंतर अनेक लोकांना एंग्झायटीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यात सनसेट एंग्झायटीचाही समावेश आहे. सनसेट एंग्झायटी म्हणजे सूर्यास्तानंतर सुरू होणारी चिंता. या स्थितीत व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दोन्ही लक्षणांचा सामना करतो.

मानसिक लक्षणं

संध्याकाळी व्यक्तीला घाबरणं, चिंता आणि भीतीचा अनुभव होऊ लागतो. या वेळी, व्यक्तीला नेहमीच असे वाटते की काही वाईट होणार आहे. त्याला भविष्याची चिंता लागून राहते. त्याचबरोबर, आत्मविश्वासाची कमी होण्यास सुरूवात होते आणि नेहमीच नकारात्मक विचार मनात येतात.

शारीरिक लक्षणं

ह्रदयाची धडधड वाढणे

थंडीत असतानाही घाम येणे

हात आणि पायांचे कंप होणे

श्वास घेताना अडचण होणे

थकवा जाणवणे

रात्री झोप न येणे किंवा वारंवार झोपमोड होणे

कारणे

मानसिक आरोग्य समस्याः जे लोक आधीच चिंता, डिप्रेशन किंवा अन्य मानसिक आजारांशी झुंजत असतात, त्यांना सनसेट एंझायटीचा त्रास अधिक होऊ शकतो.

हार्मोनल बदलः सूर्यास्ताच्या वेळी शरीरात मेलाटोनिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोनल बदलांचा प्रभाव पडतो. त्याचा मानसिक स्थितीवर परिणाम होतो.

तणावः कुटुंबातील ताण, ऑफिसमधील ताण किंवा इतर जबाबदाऱ्यांचा दबाव सायंकाळी अधिक वाढतो.

उपचार काय?

थेरपी: कॅग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी (CBT) ही एंग्झायटी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ही थेरपी नकारात्मक विचार ओळखून त्यांना बदलण्यास मदत करते. प्रोफेशनल कौन्सिलिंग देखील मानसिक ताण कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

औषधे: जर एंग्झायटी गंभीर असेल, तर डॉक्टर एंटीडिप्रेसेंट्स किंवा एंटी-एंग्जायटी औषधांची शिफारस करू शकतात.

योग आणि ध्यान: प्राणायाम, योग आणि ध्यान मानसिक स्थिती सुधारण्यासाठी उपयोगी ठरतात. डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस एंग्झायटी आणि ताण कमी करण्यात मदत करतात.

सकारात्मक वातावरण: एंग्झायटी असलेल्या व्यक्तींनी सदैव सकारात्मक वातावरणात राहणे आवश्यक आहे. हलकी आणि सकारात्मक संगीत ऐकणे, पुस्तक वाचणे किंवा क्रिएटिव्ह क्रियाकलापात गुंतणे फायदेशीर ठरू शकते.

दैनिक दिनचर्या सुधारणे: नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि जीवनशैलीत सुधारणा करणे देखील एंग्झायटीला नियंत्रित करण्यात मदत करू शकते.

डॉक्टरांशी कधी संपर्क करायचा?

जर एंग्झायटी किंवा सनसेट एंग्झायटीचे लक्षणे दीर्घकाळ राहिली असतील, तर त्वरित प्रोफेशनल हेल्थ एक्सपर्ट्स किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana :  अपात्र असूनही पैसे घेतलेल्या महिलांबाबत सरकारचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट Ladki Bahin Yojana : अपात्र असूनही पैसे घेतलेल्या महिलांबाबत सरकारचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट
ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने गेल्या वर्षी...
‘जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत अजित पवारांना राज्यात फिरू देऊ नका’; मराठा नेता आक्रमक, म्हणाला दगडं घेऊन…..
मुख्यमंत्र्‍यांच्या त्या शब्दांमुळे मी शांत आहे, जरांगे पाटील यांचा गर्भीत इशारा
‘सैफच्या आईनं हात जोडून’…जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला सैफ अली खान भेटला; नेमका काय झाला दोघांमध्ये संवाद, पाहा व्हिडीओ
पहिल्या सिनेमातून रवीना टंडनच्या लेकीला मिळालं यश, अभिनेत्री मानले साईबाबांचे मानले आभार…
वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या तांदळाचे पाणी ठरेल फायदेशीर, वजन कमी होण्यासोबतच बीपी राहील नियंत्रणात
डोनाल्ड ट्रम्प आले…शेअर बाजार घसरला; आणखी घसरणीची शक्यता, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…