हृदयाच्या आरोग्यासाठी कॉफी प्यायची योग्य वेळ कोणती ? तज्ज्ञांचे म्हणणे काय?
कॉफी प्यायला बहुतेकांना आवडते, त्यामुळे व्यक्तीचा मूड एकदम फ्रेश होत असतो. परंतू कोणत्या वेळी कॉफी प्यायल्याने आरोग्यासाठी चांगले असते. खास करुन हृदयाच्या आरोग्यासाठी कॉफी ठराविक वेळेत प्यायली तर खूपच फायद्याचे असते असे एका संशोधनातून उघड झाले आहे. या संदर्भातील संशोधन युरोपियन हार्ट जर्नल यात आज प्रसिद्ध झाले आहे. चला तर पाहूयात हृदयासाठी कॉफी प्यायची योग्य वेळ कोणती ? ते…
तुलाने युनिव्हर्सिटीच्या ( Tulane University ) सेलिया स्कॉट वेदरहेड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि ट्रोपिकल मेडिसिनचे प्रोफेसर लु की यांनी या संदर्भात संशोधन केले आहे. या अभ्यासात ४०,७२५ प्रोढांचा युएस नॅशनल हेल्थ अॅण्ड न्युट्रीशिय एक्झामिनेशन सर्व्हे ( NHANES ) साल १९९९ ते २०१८ दरम्यान करण्यात आला. प्रयोगात सहभागी उमेदवारांना त्यांनी एका दिवसात त्यांनी सेवन केलेल्या आहाराबद्दल विचारण्यात आले.ज्यामध्ये त्यांनी कॉफी घेतली का, किती आणि कधी घेतली याबद्दल विचारण्यात आले. यात एक १,४६३ जणांचा उप गट देखील होता त्यांना एक आठवडाभर त्यांनी सेवन केलेल्या अन्न आणि पेयांची संपूर्ण डायरी मेनटेन्ट करायला सांगितली गेली. संशोधकांना ही माहिती नऊ ते दहा वर्षात कोणाचा मृत्यू झाला आणि मृत्यूचे कारण काय होते याची नोंद घेतली..
संधोधकांना आढळले की अभ्यासातील ३६ टक्के लाक ज्यांना सकाळच्या वेळेत ( प्राधान्याने दुपार होण्याआधी कॉफी घ्यायचे ) आणि १६ टक्के लोक जे दिवसभरात कधी कॉफी प्यायचे ( सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ) आणि ४८ टक्के लोक कॉफी घेत नव्हते. कॉफी न पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत, सकाळी कॉफी पिणाऱ्यांमध्ये कोणत्याही कारणाने मृत्यू झालेल्यांची शक्यता १६ टक्के कमी होती आणि हृदयरोगाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३१ टक्के पेक्षा कमी होती.
सकाळी कॉफी पिणाऱ्यांना मध्यम कॉफी पिणाऱ्यांना मध्यम स्वरुपात ( दोन किंवा तीन कप ) कॉफी पिणारे किंवा जादा कॉफी पिणारे ( तीन कपाहून अधिक ) यांच्यापेक्षात अधिक फायदे मिळाले. सकाळी अत्यंत कमी कॉफी पिणाऱ्या ( एक कप किंवा त्याहून कमी ) हृदयविकाराने मृत्यूची रिस्क कमी झाली होती. हा कॉफी पिणाऱ्यांचा वेळेचा पॅटर्न आणि आरोग्य याची तुलना करणारा पहिला प्रयोग असल्याची डॉ.क्वी यांनी सांगितले. आम्हाला यातून दिसले की तूम्ही कॉफी पिता किंवा तुम्ही किती कॉफी पिता हे महत्वाचे नसून तुम्ही कोणत्या वेळात कॉफी पिता हे महत्वाचे आहे.
आणखी प्रयोगाची गरज
या अभ्यासात सकाळी कॉफी प्यायल्याने कार्डीव्हस्क्युलर डिसिजचा धोका कमी का झाला ? याचा या अभ्यासात काही उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ दुपारी किंवा सायंकाळी कॉफी प्यायल्याने सर्कॅडियन लय आणि मेलाटोनिन सारख्या हार्मोन्सच्या पातळीत व्यत्यय येऊ शकतो. यामुळे, जळजळ आणि रक्तदाब यासारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटकांमध्ये बदल होतात असे म्हणता येते. यासंदर्भात आणखी मोठ्या नमूना संख्येचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रो.ली क्वी यांनी म्हटले आहे. कॉफी पिण्याच्या वेळेचा बदल केल्याने नेमका काय परिणाम होतो हे अभ्यासण्याासाठी आणखी क्लीनिकल ट्रायल करण्याची गरज असल्याचे प्रोफेसर क्वी यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List