का नाही झालं सलमान खानचं लग्न? अभिनेत्याच्या वडिलांकडून मोठा खुलासा
Salman Khan Marriage: सलमान खानचं रिलेशनशिप स्टेटस बॉलिवूडपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा असतो आणि आजही तो एलिजिबल बॅचलर मानला जातो. सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज देखील सलमान खान एकच प्रश्न विचारण्यात येतो आणि तो म्हणजे लग्न कधी करणार? यावर सलमानचे वडील आणि लोकप्रिय लेखक सलीम खान यांनी मोठा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत सलीन खान यांनी सलमानच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. सलमान खान एका महिलेच्या शोधात आहे जी त्याची आई सलमा खानच्या घरगुती गुणांना मूर्त रूप देऊ शकेल. ‘सलमान खान ज्या महिलेकडे आाकर्षित होतो, ती महिला सलमानपेक्षा फार वेगळी असते. सलमान ज्या अभिनेत्रीवर आकर्षित झाला त्याच अभिनेत्रींसोबत त्याने काम केलं आहे.’
ज्या अभिनेत्रींसोबत सलमान काम करतो त्या दिसायला सुंदर असतात. अशात सलमान त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्यामध्ये स्वतःच्याा आईची प्रतिमा पाहण्याची त्याची इच्छा असते आणि हे शक्य नाही…. असं सलमान खान याचे वडील म्हणाले होते .
सलीम खान पुढे म्हणाले, ‘सलमान कायम मुलींमध्ये त्याच्या आईची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कोणती मुलगी सलमानला वचन देते तेव्हा सलमान तिला बदलण्यचा प्रयत्न करतो. सलमान मॉर्डन विचारांचा नाही. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेईल अशी पत्नी त्याला हवी आहे.’
‘करियर करण्याऱ्या मुलीला सलमानच्या अटी पटणाऱ्या नाहीत. सलमान खानला घरी राहणारी, घर सांभाळणारी पत्नी हवी आहे…’ असं देखील सलीम खान म्हणाले होते.’ सांगायचं झालं तर, सलीम खान कायम त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात.
सलमान खान याचे आगामी सिनेमे
एआर मुरुगादॉस द्वारा दिग्दर्शित ‘सिकंदर’ सिनेमात सलमान खान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत काजल अग्रवाल, रश्मिका मंदाना, सत्यराज, शरमन जोशी आणि प्रतीक बब्बर देखील दिसणार आहेत. सिनेमा 30 मार्च 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List