बॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्रीने जिने लग्नाआधी क्रिकेटरच्या मुलीला दिला जन्म, मात्र त्याने सोडली साथ

बॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्रीने जिने लग्नाआधी क्रिकेटरच्या मुलीला दिला जन्म, मात्र त्याने सोडली साथ

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहे, ज्यांनी प्रेम तर केलं. पण त्यांच्या वाट्याला फक्त दुःख आणि एकटेपणा आला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ता. अभिनेत्री नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. नीना गुप्ता यांनी क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना मुलीला जन्म दिला. तेव्हा नीना गुप्ता यांना अनेक संकटांचा सामना केला. बऱ्याच मुलीखतींमध्ये नीना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आणि विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत.

रिपोर्टनुसार, 1980 मध्ये नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली होती. दोघांची पहिली भेट एका सामन्या दरम्यान झाली होती. अखेर पहिल्या भेटीचं मैत्रीमध्ये त्यानंतर प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर दोघांच्या भेटी देखील वाढत गेल्या.

एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वात फक्त आणि फक्त नीना – विवियन रिचर्ड्स यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. नीना यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना विवियन रिचर्ड्स विवाहित होते. त्यामुळे नीना यांच्यासोबत विवियन रिचर्ड्स यांनी लग्न करण्याचा विचार देखील कधी केला नाही.

पण विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ता प्रेग्नेंट राहिल्या. अशात विवियन रिचर्ड्स यांनी देखील नीना गुप्ता यांची साथ सोडली. नीना आणि विवियन रिचर्ड्स यांचं फोनवर बोलणं झालं होतं. रिपोर्टनुसार, कठीण परिस्थितीत नीना यांनी गर्भपात करण्याचा देखील निर्णय घेतला. पण विवियन रिचर्ड्स यांनी असं करण्यास नकार दिला.

विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांनी कधीच लग्न केलं नाही. पण नीना यांनी कधीच त्यांच्या मुलीला वडिलांपासून दूर केलं नाही. विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता असं आहे. मुलीच्या दुसऱ्या लग्नात विवियन रिचर्ड्स उपस्थित होते. लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सांगायचं झालं तर, नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी विवेक मेहरासोबत लग्न केलं. नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता ही नुकतीच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. मसााबा गुप्ता हिने देखील काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन
सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णूपंत कोठे (वय 59) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले असताना त्यांना...
कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका
इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात 2 टक्के सूट मिळणार
HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री