PM Modi : पीएम मोदींच्या क्लासला जाताना महायुतीच्या आमदारांना सोबत नेता येणार नाही ही वस्तू
उद्या 15 जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते काही प्रकल्पांच लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मुंबई भेटीत महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तब्बल अडीच तास पंतप्रधान महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. नौदलाच्या आंग्रे सभागृहात पंतप्रधान व आमदारांची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटी दरम्यान आमदारांना मोबाईल बंदी असणार आहे. या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल. मोबाईल विधानभवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी मुंबईत दाखल होतील. त्यावेळी सकाळी 10.30 च्या सुमारास मुंबईच्या नौदल गोदीत त्यांच्याहस्ते आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या युद्धनौका आणि पाणबुडीच जलावतारण होईल. या तिन्ही युद्धनौकांच एकाचवेळी सेवेत रुजू होणं ही भारताच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. आयएनएस सूरत ही सर्वात मोठी आणि अत्याधुनिक ड्रिस्ट्रॉयर म्हणजे विनाषिका आहे. P15B गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर प्रोजेक्टमधील ही चौथी आणि शेवटची डिस्ट्रॉयर आहे. आयएनएस सूरतमध्ये 75 टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे.
आयएनएस निलगिरी स्टेल्थ फ्रिगेट
आयएनएस निलगिरी ही P17A स्टेल्थ फ्रिगेट प्रोजेक्टमधील ही पहिली युद्धनौका आहे. यामध्ये अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञान आहे. आयएनएस वाघशीर ही P75 स्कॉर्पियन प्रोजेक्टमधील सहावी पाणबुडी आहे. फ्रान्ससोबत सहकार्यातून ही पाणबुडी बनवण्यात आली आहे. पाणबुडी बांधण्याच्या तंत्रज्ञानात भारत प्रगती करत असल्याच यातून दिसतं.
नवी मुंबईत इस्कॉनच मंदिर
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई खारघर येथे इस्कॉनने बांधलेल्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराच उद्घाटन करणार आहेत. हिरव्यागार जागेत पांढऱ्या शुभ्र मार्बलने हे मंदिर बांधण्यात आलं आहे. पांडवकडा धबधब्याजवळ हे मंदिर आहे. मुंबई महानगर प्रदेशातील इस्कॉनच हे तिसरं मंदिर आहे.
अनेक नवी मुंबईकरांनी इस्कॉनच मंदिर इथे असावं अशी इच्छा व्यक्त केली होती. आठ एकरच्या प्लॉटवर हे मंदिर बांधण्यात आलं आहे. नोटबंदी आणि कोविड-19 सारख्या अडथळ्यांमुळे हे मंदिर बांधणीला विलंब झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List