…अन् तीन महिन्यानंतर तो विमानतळावर सापडला, खासगी सुरक्षा रक्षकाच्या माणुसकीने कुटुंबाशी भेट, विशाखापट्टणमच्या अभियंत्यासोबत घडले तरी काय?

…अन् तीन महिन्यानंतर तो विमानतळावर सापडला, खासगी सुरक्षा रक्षकाच्या माणुसकीने कुटुंबाशी भेट, विशाखापट्टणमच्या अभियंत्यासोबत घडले तरी काय?

विशाखापट्टणम येथील एका मॅकेनिकल अभियंत्याच्या कुटुंबियांना वर्षाअखेर मोठे गिफ्ट मिळाले. त्यांचा मुलगा गेल्या तीन महिन्यांपासून नैराश्येत गेलेला मुलगा बेपत्ता होता. त्यांच्यासाठी हा सुखद क्षण होता. पण तो अचानक मुंबईतील सहारा विमानतळावर आला. मळकटलेला, अस्वच्छ, फाटक्या कपड्यातील व्यक्तीला पाहून सुरक्षा रक्षकांनी त्याची आस्थेने चौकशी केली. त्यांच्यातील या माणुसकीने अभियंत्याचा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला. हा या कुटुंबियांसाठी या वर्षातील सर्वात सुखद क्षण होता.

नेमकं काय घडलं..

नैराश्येत गेलेला हा मॅकेनिकल अभियंता तीन महिने मुंबईच्या रस्त्यावर फिरत होता. हा अभियंता 19 डिसेंबर रोजी सहार विमानतळाजवळील रस्त्यावर भटकताना आढळला होता. त्याचे स्वरूप पूर्णपणे अस्वच्छ” होते, असे पोलिसांनी सांगितले. दाढी जास्त वाढलेली होती, त्याचे कपडे घाणेरडे होते आणि तो काहीसा त्रासलेला दिसला होता. विमानतळावर तैनात असलेल्या ‘सेक्युअर १’ चे खासगी सुरक्षा रक्षक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला विमानतळ परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला हटकले.

या सुरक्षा रक्षकांनी त्याची आस्थेने चौकशी केली. त्याचा विश्वास संपादन केला. त्याच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, त्याने सुरक्षा रक्षकांना त्याच्या वडिलांचा फोन नंबर दिला. ज्यामुळे त्यांना त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यास मदत झाली. त्याची कुटुंबियांशी भेट घडल्याची माहिती समोर येत आहे.

गोव्यातून मुंबईत आला, लुटारूंनी लुटले

तीन महिन्यांपूर्वी विशाखापट्टणमच्या घरातून बेपत्ता झालेल्या ठगारामपुडी यशवंत या ३१ वर्षीय तरुणाच्या कुटुंबासाठी हे नवीन वर्ष आनंदाचे ठरले. यशवंत हा डिप्रेशनशी झुंज देत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. बेपत्ता व्यक्तीचा अहवाल तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या गावी दाखल झाला होता. वडील ठगारामपुडी शिव प्रसाद यांनी सिक्योर 1 च्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, नैराश्याचा सामना करत असलेला त्यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी घर सोडून गेला होता

या तरुणाने नंतर खुलासा केला की तो सुरुवातीला गोव्याला गेला होता आणि शेवटी मुंबईत आला होता. परंतु तो या ठिकाणी कसा पोहोचला हे सांगता येत नाही. या तरुणाने सांगितले की, मुंबईत असताना त्याचे सामान, पैसे, पासपोर्ट, कपडे लुटले गेले. तो रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशनवर झोपला

19 डिसेंबर रोजी त्याने डिपार्चर गेटमधून विमानतळावर डोकावण्याचा प्रयत्न केला. येथील तैनात असलेले सेक्युअर १ चे सहाय्यक अधिकारी सागर रहिदुने यांनी विस्कटलेल्या कपड्यातील व्यक्तीला थांबवले. त्याने विशाखापट्टणमला घरी जायचे आहे असे सांगितले. तेव्हा, त्याला बाजूला घेऊन त्याची त्यांनी चौकशी केली.

वसमत येथील अभियंता बेपत्ता

वसमत येथील कारखाना रोड भागातील रहिवासी असणारे अभियंता योगेश उत्तमराव पांचाळ हे नांदेड मध्ये पत्नीसह राहतात. काही दिवसांपूर्वीच श्रीयोग एक्सपोर्ट नावाने नवीन कंपनीची नोंदणी केली होती. योगेश पांचाळ इराण येथील सादीक यांची कंपनी पाहण्यासाठी दि. 5 डिसेंबर रोजी मुंबई येथून इराण येथे गेले. त्या ठिकाणी ते तेहरान मधील बहारेस्तान हेरिटेज या हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांचा व्हिडीओ कॉलवरून सादीक याच्याशी संपर्कही झाला होता. तसेच त्यांनी नांदेड येथे पत्नी व लहान मुलाशी संपर्क केला. मात्र त्यानंतर 7 डिसेंबर पासून त्यांचा संपर्कच झाला नाही.

योगेश यांचा परतीचा प्रवास 11 डिसेंबर रोजी असल्यामुळे त्यांनी विमानतळावर संपर्क साधला असता योगेश विमानात बसलेच नसल्याचे सांगण्यात आले. 24 दिवसापासून संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत सापडले आहेत. योगेश यांच्या पत्नी पांचाळ यांनी या संदर्भात सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच नांदेड पोलीस अधीक्षक व खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. सरकारने माझ्या पत्नीचा शोध लावा अशी विनंती योगेश पांचाळ यांच्या पत्नी श्रद्धा पांचाळ यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा ‘बिग बॉस’चे विजेते आधीपासूनच ठरलेले असतात..; पूर्व विजेती शिल्पा शिंदे मोठा दावा
‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले येत्या 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक असून त्यांच्यामध्ये...
…तर माझं आयुष्य नरकचं बनलं असतं, रेखा – अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर जया बच्चन यांची प्रतिक्रिया
बॉलीवूड स्टार्सच्या बॉडीगार्ड्सचे पगार असतात लाखोंच्या घरात? आलिया भट्टच्या बॉडीगार्डने थेट सांगितले आकडे
लग्न करून आयुष्य उद्ध्वस्त; ‘महाभारत’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट, AI इंजीनिअर अतुल सुभाषशी केली तुलना
मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा
आमच्या कुटुंबातील सदस्याचं बर वाईट झाल्यानंतर सरकार आम्हाला न्याय देणार का? वैभवी देशमुखचा सवाल
10 रुपयांसाठी बसमध्ये तुफान हाणामारी, कंडक्टर आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल