महाकुंभमध्ये सर्वांत सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्ध झालेल्या हर्षाचं सत्य आलं समोर; साध्वी नव्हे तर..

महाकुंभमध्ये सर्वांत सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्ध झालेल्या हर्षाचं सत्य आलं समोर; साध्वी नव्हे तर..

महाकुंभच्या पहिल्याच दिवशी सर्वांत सुंदर साध्वी म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली हर्षा रिचारियाचा जुना व्हिडीओ व्हायरल होताच सत्य समोर आलं आहे. हर्षा दोन वर्षांपूर्वी साध्वी बनल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता मला साध्वी म्हणू नका, असं तिने स्पष्ट केलंय. महाकुंभमधील सर्वांत सुंदर साध्वी अशी चर्चा झाल्यानंतर आता हर्षा साध्वी नसल्याचं म्हटलं जात आहे. हर्षाचे महाकुंभमधील फोटो आणि व्हिडीओ पहिल्या दिवसापासूनच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतकंच नव्हे तर यामुळे हर्षाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सचा आकडा अत्यंत जलदगतीने वाढत चालला आहे. गेल्या काही तासांत तिच्या फॉलोअर्सची संख्या काही हजारांनी वाढली आहे.

शनिवारी महाकुंभमध्ये निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीत हर्षाला पाहिलं गेलं होतं. यावेळी ती इतर संतांसोबत रथात बसलेली दिसली. कुतूहलापोटी काही इन्फ्लुएन्सर, युट्यूबर्स आणि माध्यमांशी तिच्याशी संवाद साधला. “इतकी सुंदर दिसतानाही तू साध्वी का झालीस”, असा प्रश्न एकाने विचारल्यावर हर्षाने सत्य सांगितलं नव्हतं. उलट गेल्या दोन वर्षांपासून मी साध्वी बनली असून मला माझ्या आयुष्यात एक वेगळीच शांती अनुभवता येतेय, असं ती म्हणाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हर्षाचं सोशल मीडियावरील अकाऊंट पाहिलं. त्यावर तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये ती अँकरिंक करताना दिसतेय. हर्षाचा ग्लॅमरस अंदाजही नेटकऱ्यांना दिसला.

त्यानंतर एका टीव्ही चॅनलशी बोलताना हर्षाने स्पष्ट केलं, “मी साध्वी होण्याच्या दिशेने पावलं टाकतेय. मात्र मी अजून साध्वी झाली नाही. त्यासाठी एक दीक्षा घ्यावी लागते, अनेक विधी करावे लागतात. माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी असं म्हटलं. मला सर्वांत सुंदर साध्वी असं नाव दिलं गेलं. हे सर्व पाहून मला बरं वाटलं. पण मला साध्वी म्हणणं योग्य नाही, असं मला वाटतं. माझ्या गुरुदेवांनीही असा आदेश दिलेला नाही. त्यामुळे मला कृपया साध्वी म्हणू नका.”

हर्षा ही अँकर, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. महाकुंभमध्ये येण्यापूर्वी तिचे सोशल मीडियावर जवळपास साडेपाच लाख फॉलोअर्स होते. आता तो आकडा वाढून आठ लाख इतका झाल आहे. ग्लॅमरच्या दुनियेतून ऋषी-मुनी, साधू-संतांच्या महाकुंभमध्ये येण्याबाबत ती पुढे म्हणाली, “काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात. आपल्या आयुष्यात कधी काय घडावं, हे आधीच ठरलेलं असतं. मी माझं आयुष्य खूप चांगल्याप्रकारे जगतेय, परदेशात फिरतेय. आता काही काळ मी या सर्वांमधून ब्रेक घेतला आहे. मी गुरुदेवांच्या शरणी आले आहे. इथलं जीवन पूर्णपणे वेगळं आहे. इथे कोणताच दिखावा नाही, फक्त देवाचं नाव आहे.”

संन्यास घेण्याविषयी हर्षा पुढे म्हणाली, “मी माझ्या गुरुदेवांना संन्यास घेण्याबद्दल सांगितलं, पण त्यांनी मला नकार दिला. याबद्दल त्यांनी मला खडसावलं होतं. सध्या तुला कौटुंबिक जीवनातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे, असं त्यांनी सांगितलं. त्या जबाबदाऱ्या मला पूर्ण कराव्या लागतील. तोपर्यंत मी माझी साधना करत राहीन आणि माझं काम करत राहीन.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन
सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णूपंत कोठे (वय 59) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले असताना त्यांना...
कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका
इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात 2 टक्के सूट मिळणार
HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री