98 दिवस ‘बिग बॉस 18’मध्ये राहिलेल्या चाहत पांडेनं कमावले तब्बल इतके लाख रुपये..
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे 'बिग बॉस 18'च्या बाहेर पडली आहे. ग्रँड फिनालेच्या काही दिवस आधीच चाहतचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर पडले. आधी श्रुतिका आणि त्यानंतर आता चाहतला एलिमिनेट करण्यात आलं.
चाहत पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात आणि सोशल मीडियावर चर्चेत होती. तिच्या खासगी आयुष्यावरून बरीच कॉन्ट्रोव्हर्सीसुद्धा झाली. चाहत बिग बॉसच्या घरात जवळपास 98 दिवस राहिली.
चाहत 14 आठवड्यांपर्यंत या शोमध्ये होती. 'बिग बॉस 18'च्या घरात चाहतने कोणासोबतच गट केला नाही. ती एकटीच खेळली. कदाचित यामुळेही तिला घराबाहेर पडावं लागल्याचं म्हटलं जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List