Torres Fraud : हिरे नव्हे दगड देऊन फसवणूक, तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा; टोरेस प्रकरणात आता ईडीची एन्ट्री

Torres Fraud : हिरे नव्हे दगड देऊन फसवणूक, तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा; टोरेस प्रकरणात आता ईडीची एन्ट्री

नववर्षाच्या सुरूवातीलाच मुंबईतील एक सर्वात मोठा आर्थिक घोटाळा उघड झाल्याने खळबळ माजली होती. टोरेस ज्वेलर्सने घसघशीत रिटर्न्स देण्याचं अमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक केली आहे. कोट्यावधींच्या या घोटाळ्यात आत्तापर्यंत तीन जणांना अटक झाली असून आता याप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. टोरेस फसवणूक प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली असून या प्रकरणी ईडीने गुन्हा ( ECIR ) नोंदवला आहे. तसेच ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच आणखी एक धक्कादायक माहिती या प्रकरणात समोर आली आहे, ती म्हणजे टोरेस घोटाळ्यात विकले गेलेले हिरे,स्टोन हे खरे नसून ते नकली आहेत, असा दावा आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे. हजारो गुंतवणूकदारांना विकले गेलेले हिरे आणि स्टोन बनावट होते असे टोरेस गुंतवणूक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) असे आढळून आले . 500 ते 1,000 रुपये किमतीचे स्टोन उच्च-किंमत रत्न म्हणून जास्त किमतीत विकले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. एकंदरच या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली असून आपले लुटलेले पैसे परत मिळावेत यासाठी गुंतवणूकदारांनी तगादा लावला आहे.

टोरेस घोटळ्यात आता ईडीची एन्ट्री

मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालय, मुंबई यांनी टोरेस पॉन्झी स्कीम प्रकरणातील कथित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसाठी गुन्हा दाखल केला आहे. ईडीचे प्रकरण मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. ज्यात भाजी विक्रेता वैश्य (31) या तक्रारदाराने असा दावा केला आहे की टोरेस कंपनीमध्ये 1.25 लाख लोकांनी पैसे गुंतवले आहेत. सुरुवातीला, एफआयआरमध्ये 66 गुंतवणूकदारांची 13.85 कोटी रुपयांची रक्कम नमूद करण्यात आली होती. नंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेनुसार, रविवारपर्यंत, जवळपास 2,000 गुंतवणूकदार समोर आले असून गुंतवणूकदारांनी आता पर्यत जवळपास 37 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा तपशील दिला आहे. या प्रकरणात झालेल्या मनी लाँडिंगची चौकशी ईडी करणार आहे . मनी लाँड्रिंगच्या पैलूवर ईडीच्या तपासात लक्ष केंद्रित करण्याच येणार आहे. फसवणूक केलेला निधी कसा हस्तांतरित केला गेला आणि लाँडर कसा करण्यात आला हे ईडी हे तपासत आहे. ज्यामध्ये प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश आहे, ज्याने फेब्रुवारी 2023 मध्ये काम सुरू केले होते. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आता पर्यंत 3 आरोपींना अटक झाली असून अजून जवळपास 12 आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

विकले गेलेले हिरे, स्टोन्स बनावट

टोरेस घोटाळ्यात विकले गेलेले हिरे,स्टोन हे नकली असल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. हजारो गुंतवणूकदारांना विकले गेलेले हिरे आणि स्टोन बनावट होते, असे टोरेस गुंतवणूक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) आढळून आले. 500 ते 1,000 रुपये किमतीचे स्टोन उच्च-किंमत रत्न म्हणून जास्त किमतीत विकले जात होते. पीडितांना युक्रेनियन स्कॅमर्सनी तयार केलेल्या gra-gems.com या वेबसाइटवर बनावट प्रमाणपत्रे दाखवून आमिष दाखवण्यात आले. प्रत्येक प्रमाणपत्रामध्ये एक युनिक कोड होता, ज्यामुळे ग्राहकांना अधिक विश्वासार्हतेसाठी स्मार्ट कार्ड वापरून स्टोनचे तपशील स्कॅन आणि सत्यापित करता येतात. अशी प्रमाणपत्रे सामान्यत: GIA किंवा IGI सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे जारी केली जातात, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र टोरेस प्रकरणात या कंपन्या नव्हत्या.

प्रथमदर्शनी अंदाजे 25 कोटी रुपये शोरूम भाड्याने , फर्निचर, हिरे आणि तत्सम दागिने खरेदी करणे आणि हा गुन्हा करण्यासाठी प्रारंभिक परतावा करणे यासाठी खर्च केले गेले, असे सोमवारी, पोलिसांनी विशेष एमपीआयडीए न्यायालयात सांगितले. ही साखळी चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील 18,000 हून अधिक लोकांची गुंतवणूक योजनांद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती .आतापर्यंत झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, आरोपी कंपनीच्या मुंबईतील कार्यालयातून 16.29 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपी तानिया आणि व्हॅलेंटिना कुमार यांच्या वैयक्तिक झडतीदरम्यान 77.15 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

टोरेसच्या कांदिवलीतील कार्यालयावर छापे

आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळ्याप्रकरणी तपास सुरु असून कांदिवलीतील पोईसर भागातील टोरेसच्या कार्यालयावर सोमवारी गुन्हे शाखेने छापा टाकला. पोईसरमध्ये २९ डिसेंबर रोजी टोरेसची सहावी शाखा सुरु करण्यात आली होती. घोटाळ्याचा उलगडा झाल्यामुळे आठवड्याभरात शाखेला टाळे लागले. त्यामुळे या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यामुळे काही नवीन बाबींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी दिवसेंदिवस नवीन बाबी समोर येत आहेत. टोरेसमध्ये हजारो, लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या नागरिकांना अद्यापही दिलासा मिळालेला नसून गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यााठी गुंतवणूकदारांचे अद्यापही प्रयत्न सुरू असून तो पोलीस ठाण्यात खेपा घालत आहेत. संबंधित प्रकरणाचा संपूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून टोरेसच्या मुंबईतील सर्व कार्यालयांतून साधारण ९ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

कांदिवलीतील पोईसर भागात २९ डिसेंबर रोजी टोरेसने नव्या शाखेचे उदघाटन केले, मात्र केवळ आठवड्याभरातच ही शाखा बंद झाली, त्यामुळे ही शाखा दुर्लक्षित होती. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी या शाखेवर छापा टाकल्यामुळे आणखी नव्या बाबी समोर येण्याची शक्यता असून या शाखेबाबत आणखी चौकशी केली जात आहे.

भारतभर 400 स्टोअर उघडण्याची योजना होती

टोरेस कंपनीची भारतभर 400 स्टोअर उघडण्याची योजना होती असा दावा कंपनी सीए अभिषेक गुप्तच्या वकिलाने केला आहे. आपल्या जीवाच्या भीतीने टोरेसचे सीए अभिषेक गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. मुंबईतील सहा शोरूमद्वारे1.25 लाख गुंतवणूकदारांची 1 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टोरेस कंपनी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र याच टोरेस कंपनीची देशभरात 400 शोरूम्स उघडण्याची योजना होती असे समोर आले आहे. त्यांच्या क्लायंटला परदेशी आरोपीयांनी गुजरात, चेन्नई, बेंगळुरू आणि इतर ठिकाणी शोरूम सुरू करण्याच्या योजनेबद्दल सांगितले होते, असे टोरेसचे चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक गुप्ता यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांनी नमूद केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले? …तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
आज अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती....
जया बच्चन हजारोंसमोर सुनेबद्दल असं काही बोलल्या,ते ऐकून ऐश्वर्याला रडू आलं, व्हिडीओ व्हायरल
कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय बीडीडीतील इमारतीचे पाडकाम का केले? आदित्य ठाकरे यांचा सवाल
Kho-Kho World Cup 2025 – हिंदुस्थानच्या मुलींची कमाल, दक्षिण कोरियाचा 157 गुणांनी उडवला धुव्वा
Crime News – मृत्युनंतर काय होतं…गूगलवर सर्च करत नववीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
‘कारागृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो…’, गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांचा आरोप
मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली