संतोष देशमुख प्रकरण : माझ्या राजीनाम्याची गरज नाही, मंत्री धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणात महत्वाचा आरोपी वाल्मिक कराड सीआयडींना शरण आला आहे. वाल्मिक कराड या मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा व्यक्ती तपासावर प्रभाव येऊ शकत असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करीत आहे. या मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्याने आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.त्यानंतर २२ दिवसांनी मुख्यसूत्रधार वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आले होते. या प्रकरणात चौघा आरोपींना आधीच अटक झाली आहे तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटचे असल्याने तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे. त्यामुळे आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही. या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याची मागणी आपणच विधीमंडळात सर्वप्रथम केली होती असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
( बातमी अपडेट होत आहे.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List