हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका झाली एका झटक्यात बेघर, फोनही बंद; प्रचंड पैसा असूनही रस्त्यावर येण्याचं कारण काय?

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका झाली एका झटक्यात बेघर, फोनही बंद; प्रचंड पैसा असूनही रस्त्यावर येण्याचं कारण काय?

लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक हॉलिवूड स्टार्सना त्यांची घरे सोडावी लागली. असे अनेक लोक आणि सेलिब्रिटी आहेत ज्यांचे आलिशान बंगले जळून राख झाले आहेत.

लॉस एंजेलिस येथे लागलेल्या जंगलातील आगीमुळे सेलिब्रिटी बेघर 

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या जंगलात लागलेल्या आगीने तेथील हॉलिवूड स्टार्सना चांगलंच अडचणीत आणलं आहे. कारण आगीने संपूर्ण हॉलिवूड हिल्सला वेढले आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना घरे आणि त्यांचे बंगलो सोडण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये अनेक स्टार्सचाही सहभाग होता.

गायिका ब्रिटनी स्पीयर्स देखील या सेलिब्रिटींमध्ये आहे ज्यांना आपले घर सोडावे लागले. लॉस एंजेलिसमधील वणव्यामुळे तिला आपला आलिशान बंगला सोडावा लागला.

ब्रिटनीने सोशल मीडियावर तिची व्यथा मांडली 

ब्रिटनीने सांगितल्याप्रमाणे कॅलिफोर्नियातील थाउजंड ओक्स येथे तिचे 7.4 दशलक्षचे अलिशान घर सोडून त्यांना हॉटेलमध्ये आश्रय घ्यावा लागला. स्पीयर्सने इंस्टाग्रामवर एका पोस्टमधून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले आहे “मला आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे असाल. मला माझे घर रिकामे करावे लागले आणि मी तब्बल 4 तासांचा प्रवास करून एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले आहे.

दोन दिवस वीज नाही

स्पीयर्सने असेही सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून तिच्याकडे वीज नव्हती, त्यामुळे ती फोन चार्ज करू शकत नव्हती. ती म्हणाली की “मला नुकताच माझा फोन परत मिळाला आहे. मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करते आणि माझे प्रेम पाठवते”


2015 मध्ये आलिशान घर विकत घेतलं होतं

एका रिपोर्टनुसार 2015 मध्ये खरेदी केलेला त्याचा 13,000 स्क्वेअर फूट इटालियन शैलीचा व्हिला सध्या सुरक्षित आहे. लॉस एंजेलिस परिसरातील शेकडो हजारो लोकांना पॅलिसेड्स परिसरात जंगलात लागलेल्या आगीमुळे घरे सोडावी लागली आहेत. आतापर्यंत यात किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमुळे आणि त्यानंतरच्या घटनांमुळे अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या घरातून बेघर झाले आहेत.

पॅरिस हिल्टनचे घरही उद्ध्वस्त झाले

ब्रिटनी स्पीयर्सची मैत्रीण आणि “द सिंपल लाइफ” स्टार पॅरिस हिल्टन हिनेही तिचे मालिबूमध्ये असणारे घर आगीत गमावले. पॅरिसने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की “तिला फार दु:ख झाले असून कुटुंबासोबत तुमचे घर टीव्हीवर लाइव्ह जळताना पाहणे ही प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे.” अशी पोस्ट करत तिने दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान पॅरिसने तिचे कुटुंब सुरक्षित असल्याचं तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. तसेच तिची कंपनी 11:11 मीडिया इम्पॅक्ट गरजू लोकांना मदत करण्यासाठी काम करत असल्याचंही तिने सांगितले.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्… आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्…
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये...
‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
HMPV आणि COVID-19 दोन्ही आजार सारखेच आहेत की वेगळे? जाणून घ्या
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट