Ragi Benefits : झटपट वजन कमी करायचंय? आहारात करा ‘या’ पदार्थाचे सेवन; आरोग्याला होतील अनेक फायदे

Ragi Benefits : झटपट वजन कमी करायचंय? आहारात करा ‘या’ पदार्थाचे सेवन; आरोग्याला होतील अनेक फायदे

नाचणी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे अनेकजण आजही नाचणीच्या भाकरीला पसंती देतात. नाचणीमधील पोषक तत्वं तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. नाचणीचे सेवन केल्यास तुमच्या हाडांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या नाचणी अत्यंत फायदेशीर ठरते.

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला निरोगी राहाण्यास मदत होते. फायबरमुळे तुमचं पोट दीर्घकाळ भरल्यासारखं राहातं ज्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही. याशिवाय नाचणीचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील चयापचय वाढण्यास मदत होते. नाचणीमध्ये कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी हळूहळू वाढते. त्यासोबतच नाचणीचे थंडीमध्ये सेवन केल्यास तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उर्जा निर्माण होते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात स्नायूंची वाढ होते. नाचणीमधील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, लोह आणि कॅल्शियम तुमचं शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

तुमच्या आहारामध्ये नाचणीची भाकरी आणि दहीचा समावेश करू शकता ज्यामुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळण्यास मदत होईल. अनेकजण नाचणीची लापशी देखील बनवतात हा तुमच्यासाठी एक पौष्टीक ब्रेकफास्ट ठरू शकते. याच्या सेवनामुळे तुमच्या घरातील लहानमुलांच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होण्यास मदत होते. अनेकजण नाचणीची पेज देखील बनवतात ज्यामुळे आजारपणामध्ये तुमच्या आरोग्याला भरपूर प्रमाणात ताकद मिळते. नाचणीचे सत्व चवीष्ट लागते आणि आरोग्याला फायदेशीर असते.

नाचणीचे आरोग्यदायी फायदे :

1) नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

2) नाचणीमधील फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते .

3)नाचणीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ॲनिमिया सारखे आजार दूर राहाते.

4)नाचणीमधील अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्… आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्…
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये...
‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
HMPV आणि COVID-19 दोन्ही आजार सारखेच आहेत की वेगळे? जाणून घ्या
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट