अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, केलं रुग्णालयात दाखल; प्रकृती कशी?
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते टिकू यांना हृदय विकाराचा झटका
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. टिकू यांना रुग्णालायात भरती केलं असून त्यांच्यावर उपचारही सुरु आहे. त्यांची प्रकृती सध्या नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे आता टिकू यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.
परिस्थिती नाजूक असल्याची बातमी
दरम्यान अभिनेते टिकू तलसानियांवर उपचार सुरु असून डॉक्टर त्यांची तब्येत बिघडण्याच कारण शोधत आहेत. तसेच त्यांच्य़ा इतर तपासण्याही सुरु असल्याचं म्हटलं जातं. त्यात आता त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितल्यामुळे सर्वांना अजूनच चिंता वाटत आहे. टिकू यांची ही बातमी सर्वांनाच धक्का देणारी आहे.
ते इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. अशा परिस्थितीत ते लवकरच बरे होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. सध्या तरी त्यांच्या कुटुंबियांकडूनही कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये.
आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले
टिकू यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. नुकतेच ते राजकुमार रावबरोबर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’या चित्रपटात दिसून आले होते. यामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील मिळाली होती. मात्र त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
सध्या टिकू 70 वर्षांचे असून 1984 साली टेलिव्हिजन शो ‘ये जो है जिंदगी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दोन वर्षानंतर म्हणजे 1986 साली त्यांनी ‘प्यार के दो पल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘प्यार के दो पल’, ‘ड्यूटी’, ‘असली नकली’ या चित्रपटांमध्ये दिसून आलए. त्याच प्रमाणे ‘बोल राधा बोल’, कुली नंबर 1’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हीरो नंबर 1’, ‘बडे मिया छोटे मिया’ ‘विरासत’ व ‘हंगामा 2’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
दरम्यान त्यांची तब्येत लवकरच सुधारावी आणि ते या आजारातून बरे व्हावे यासाठी सर्वजणचं त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List