मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक राऊत
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांच लक्ष आहे. त्यामुळे जेव्हा मुंबई महानगरपालिका निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तेवढ्याच ताकदीने लढणार आणि जिंकणार सुद्धा, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
विनय राऊत म्हणाले की, ”मागच्या तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाही. निवडणूक आलेल्या तत्कालीन आणि आताचे माजी नगरसेवक यांना विकास निधी उपलब्ध होत नाही. मात्र ज्यांनी गद्दारी केली, यात मिंधे गट असो की भाजप यांना निधी दिला जात आहे. यामुळे जी विषमता निर्माण झाली आहे, यामुळे आमच्या काही निष्ठावान लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मात्र ही नाराजी पक्षावर नाही तर, मिंधे आणि भाजपवर आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List