हापूस तर हापूस केसरने पण भाव खाल्ला,पहिली पेटी वाशीत मार्केटला आली हो…किंमती किती पाहा
फळांचा राजा आंबा न आवडणारी व्यक्ती विरळच.. आंबा त्यात हापूस आंब्याचा सुंगध जरी सुटला तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे तर आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. या आंब्याचा सिझन अजून सर्वसामान्यांच्यासाठी सुरु झालेला नाही. काही जण अक्षय तृतीयेनंतर आंबा खाण्यास लोक सुरुवात करतात. आंबा फळ असे आहे की जर खरी कोणी आमरस केला असेल तर या या..आमच्या घरी आमरस पुरीचा बेत आहे असं कोणी आवतण देत नाही. कारण हे फळ मोसमाआधीच चाखायचे असेल तर खिशात भरपूर नोटा असाव्या लागतात..अशात बाजारात साल २०२५ ची पहिली केसर आंब्याची पेटी दाखल झाली आहे. तिची किंमत पहाल तर तोंडाचे पाणी पळेल…केसर आता किंमतीत हापूसलाही टक्कर देत आहे.
उन्हाळ्यात मार्च महिन्यात आंबे खाणारे तसे श्रीमंतच म्हटले जातात. परंतू आता १० जानेवारीलाच देवगडच्या केसर आंब्याची पहिली मानाची पेटी वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारात दाखल झाली आहे. देवगडचे आंबा बागायतदार शकील मुल्ला यांनी सोमवारी पाच डझन आंब्याची पेटी बाजार समिती विक्रीसाठी पाठविली होती. या वाघाटन या गावातून पाच डझन आंब्याची पेटी देवगडवरुन बाजार समिती विक्रीसाठी पोहचल्याने त्या पेटीस १६ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.. म्हणजे एका फळासाठी २६६ रुपये मोजावे लागले आहेत.
डझनला ३,२०० रुपये
देवगडच्या शकील मुल्ला यांनी पाठविलेल्या पाच डझन आंब्याची पेटीला १६,००० रुपये भाव मिळाला आहे. प्रत्येक डझनाची किंमत ३,२०० रुपये आहे. एका आंब्यासाठी २६६ रुपये आहे. या वर्षी आंब्याचा सिझन उशीरा सुरु झाला आहे.आंब्याची नियमित आवक मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होते. केसर आंबे खरे तर पारंपारिकपणे गुजरातला पिकतात. गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रातील कोकणात देखील केसरची पैदाईस होत आहे.
आफ्रीकन मलावी हापूस
या वर्षी दक्षिण आफ्रीकेच्या मलावी हापूस आणि आणि अन्य दोन जातीचे आंबे देखील विकले जात आहेत. व्यापाऱ्यानी सांगितले की बाजार समितीत आता अनेक जातीचे आंबे उपलब्ध होऊ शकणार आहेत. सोमवारी वाशी नवीमुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिली केसर आंब्याची पेटी पोहचली आहे. यंदा अल्फान्सो ( हापूस ) ऐवजी देवगड केसरचे आंबे देखील दाखल झाले आहेत. देवगड केसरचे पाच डझनची पेटी दाखल झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List