Bandra Bharatnagar : ‘पोलीस कमी पडतील’, वांद्रयात अदानीच्या एका प्रोजेक्टवरुन राड्याची स्थिती

Bandra Bharatnagar : ‘पोलीस कमी पडतील’, वांद्रयात अदानीच्या एका प्रोजेक्टवरुन राड्याची स्थिती

वांद्र्याच्या भारत नगरमध्ये SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार आहे. त्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला आहे. एसआरएचे अधिकारी JCB सह दाखल झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हे बांधकाम पाडण्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई इथे दाखल झाले असून एसआरएच्या तोडक कारवाईला त्यांचा विरोध आहे. घरांवर जेसीबी चालणार म्हणून सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासन आणि नागरिकांमध्ये राड्याची स्थिती निर्माण झालीय.

“वांद्रेपूर्वेला आधी एचडीआयएल दीवाण बिल्डरचा प्रकल्प सुरु आहे. 97-98 साली सुरुवात झालेली. आज 25-26 वर्ष होऊनही लोकांना घर मिळालेलं नाही. दीवाण जेलमध्ये गेल्यानंतर अदानी आला. आज अदानीची इथे गुंडागर्दी सुरु आहे. कुठलाही करार न होता थेट नोटीस येते. आम्ही ही तोडकारवाई होऊ देणार नाही” अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. “आमची तिसरी पिढी इथे राहतेय. पैसा देत नाही, दुसरं घर देत नाही, थेट नोटीस. आम्ही कधीच अशा तोडककारवाईला परवानगी देणार नाही” असं एक महिलेने सांगितलं.

ग्राऊंड प्लस फाय अशा पद्धतीने इथे झोपड्या

स्थानिक आणि त्यांचे वकील एसआरए, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टाची कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण एसआरएचे अधिकारी काहीही ऐकून घेण्याच्या स्थितीत नाहीत. कारण ग्राऊंड प्लस फाय अशा पद्धतीने इथे झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. एसआरए, महापालिका कधीच अशी परवानगी देत नाही. नागरिकांकडे पुरावे नाहीत, असं एसआरएसच म्हणणं आहे.

‘पोलीस कमी पडतील’

“परवा मी अख्खा दिवस एसआरएच्या ऑफिसमध्ये होतो. मी सांगत होतो, हे करु नका. लोकांच्या रोषाला सामोर जावं लागले. लोकांचा रोष तुम्ही पाहू शकता, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. अदानी ग्रुप हा केवळ पैशाने विकत घेऊ शकतो. लोकांना विकत घेऊ शकत नाही. मी थांबलो, तर गर्दी वाढत जाईल, पोलीस कमी पडतील. असं कृपया करु नका. मी कळकळीची विनंती करतो” असं स्थानिक आमदार वरुण सरदेसाई म्हणाले.

‘तुम्ही मानवतेला धरुन हे काम करत नाहीयत’

“मी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फक्त आश्वासन मिळाली. दीडशे-दोनशे पोलीस घेऊन येऊ नका. विकास करण्याआधी लोकांना विचारा. त्यांना विश्वासात घ्या. तोडणाऱ्या 180 घरांसोबत कुठलाही करार झालेला नाही. तुम्ही मानवतेला धरुन हे काम करत नाहीयत” असं वरुण सरदेसाई म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती तक्रार प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती तक्रार
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. यातच आता...
युजवेंद्र धनश्रीनंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या चर्चा, पत्नीसोबतचे फोटो केले डिलिट
‘सरडा रंग बदलतो, पण अशी नवीन जात…’, एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना डिवचले
‘महिला आयोगावर कचकड्या भावल्या बसवल्यामुळं…’ पुण्यातील ‘त्या’ प्रकरणावरून अंधारेंचा चाकणकरांना टोला
‘एवढा मोठा माणूस असं बोलतोय…’, L&T कंपनीच्या चेयरमनच्या 90 तासांच्या वक्तव्यावर दीपिका पदुकोण भडकली
खो-खोच्या राष्ट्रीय संघांमध्ये महाराष्ट्राचा बोलबाला, पुरुषांच्या कर्णधारपदी प्रतिक वाईकर तर महिलांच्या कर्णधारपदी प्रियांका इंगळे
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरु करा, अन्यथा गोरखपूर गाडी थांबवणार – विनायक राऊत