चित्रपट निर्माते, माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चित्रपट निर्माते, माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चित्रपट निर्माते माजी खासदार प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. प्रितीश नंदी हे शिवसेनेच्या पाठींब्यावर राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यांनी पत्रकारितेत मोठे करियर केले होते. तसेच अनेक पुस्तकांचे लेखक तसेच टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि 1980 च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक पदही भूषविले होते.

अनुपम खेर यांची पोस्ट –

चित्रपट निर्माते, माजी खासदार, कवी लेखक पत्रकार अशा विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रितीश नंदी यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियातून अभिनेते अनुपम खेर यांनी दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट टाकीत प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रितिश नंदी यांच्या निधनाबद्दल मला अतिव दुःख होत आहे आणि हे वृत्त ऐकूण आपल्याला धक्का बसला आहे. एक अद्भूत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक आणि पत्रकार आपण गमावला आहे. माझ्या मुंबईतील सुरुवातीच्या उमेदीच्या काळात माझे प्रेरणा एक मोठा स्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत.

 पत्रकार,  कवी, लेखक ते  राज्यसभेतील खासदार

प्रितीश नंदी यांचा जन्म १५ जानेवारी १९५१ रोजी पूर्व भारतातील बिहार राज्यातील भागलपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला होता. त्यांनी कवी ,चित्रकार, पत्रकार, संसदपटू, मीडिया आणि दूरदर्शन आदीत त्यांनी मोठे काम केले होते. ते महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर ते निवडून आले होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर केले आहे. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि १९८० च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

चित्रपटांची निर्मिती

२००० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स या बॅनरखाली सूर, कांटे, झंकार बीट्स, चमेली, हजारों ख्वैशीं ऐसी, प्यार के साईड इफेक्ट्स यांसारख्या चित्रपटांसह ४० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या कंपनीने अलीकडेच फोर मोअर शॉट्स प्लीज आणि मॉडर्न लव्ह मुंबई या काव्यसंग्रह मालिकेची निर्मिती केली.

दूरदर्शनवरील टॉक शो प्रसिद्ध

प्रितिश नंदी हे पत्रकार आणि मानवतावादी होते.त्यांनी १९९० च्या दशकात दूरदर्शनवरील ‘प्रितिश नंदी शो’ नावाचा टॉक शो देखील होस्ट केला होता. त्यात ते सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Santosh Deshmukh Murder Case ; राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन, या मागण्यांसाठी सरपंच परिषद आक्रमक Santosh Deshmukh Murder Case ; राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन, या मागण्यांसाठी सरपंच परिषद आक्रमक
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन सुरू आहे. अखिल भारतीय सरपंच...
Uddhav Thackrey : महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे एकला चलो रे? शिवसैनिकांचा स्वबळाचा नारा, ‘तो’ अहवाल महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार
अखेर अल्लू अर्जुनने चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची घेतली भेट; पहा व्हिडीओ
प्रत्युषाकडून काम्याने घेतली लाखोंची उधारी; लावलं दारूचं व्यसन, एक्स बॉयफ्रेंडचा दावा
आशा आहे की आजची रात्र आपली सुरक्षित जाईल, लॉस एंजेलिस आग प्रकरणी प्रियांका चोप्राची इंस्टापोस्ट चर्चेत
धर्मवीरांच्या नावाखाली स्वतःचे ब्रँडिंग; मिंधेंच्या बेगडी प्रेमाचा पर्दाफाश, आनंद दिघे यांचे स्मारक कागदावरच
Pune news – वैकुंठ स्मशानभूमीतून कुत्र्यांनी पळवले मृतदेहाचे तुकडे; पावाचे तुकडे आणि नारळ असल्याचा पालिकेचा दावा