दिल्लीत टीएमसीचा ’आप’ला पाठिंबा, केजरीवालांनी मानले आभार
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने सत्ताधारी आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. ‘दिल्ली विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आपला पाठिंबा दिल्याबद्दल ममतादीदी यांचा आभारी आहे. धन्यवाद दीदी! तुम्ही नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात आम्हाला साथ दिली आहे’, असे केजरीवाल यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून म्हटले आहे. दिल्लीत 70 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. दिल्लीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 तारखेला मतमोजणी होणार आहे. आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List