मंत्रालयात लेंबॉर्गिनी की सवारी… नंबर वन ‘ईडी’ सीरिजचा क्रमांक

मंत्रालयात लेंबॉर्गिनी की सवारी… नंबर वन ‘ईडी’ सीरिजचा क्रमांक

मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना लांबच लांब रांगा, आधारकार्ड, फोटो अशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, मग कुठे मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश मिळतो. पण मंत्रालयात थेट प्रवेश मिळालेली काळा रंग, काळय़ा काचांची व्हीव्हीआयपी क्रमांकाची आलिशान लेंबॉर्गिनी कार आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली होती. मुख्य म्हणजे, एक नंबर ‘ईडी’ या सीरिजच्या रजिस्ट्रेशन क्रमांकामुळे तर चर्चेला अधिकच उधाण आले होते.

राज्यात स्थानिक पातळीवर कामे होत नसल्यामुळे ग्रामीण भागातून दररोज असंख्य लोक मोठय़ा आशेने मंत्रालयात येतात. खासकरून मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी तर झुंबड उडालेली असते. प्रवेश करण्याचा पास काढण्यासाठी लोकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर मोठय़ा मुश्किलीने प्रवेश मिळतो. पण मंत्री आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आणि मुख्य म्हणजे उद्योगपती आणि बिल्डरांना अगदी सहजपणे मंत्रालयात प्रवेश मिळतो. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या दिवशी शिंदे गटाचे एक मंत्री तर कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन मंत्रालयात आले होते, पण या सर्वांना रोखायची हिंमत पोलिसांमध्ये नव्हती.

…उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन
आकाशवाणी समोरच्या गार्डन गेटवर काळय़ा रंगाची इटालियन बनावटीची आलिशान लेंबॉर्गिनी गाडी आली. गाडी मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वीच सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री कार्यालयातून गार्डन गेटवरील कंट्रोलला फोन आला. गाडी गेटवर येताच दोन पोलीस अधिकारी धावत पुढे गेले. लेंबॉर्गिनीच्या काळय़ा रंगाच्या काचा खाली आल्या. आतून शुद्ध मराठी भाषेत बोलणाऱया व्यक्तीने पोलिसांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यामुळे गाडीची कोणतीही तपासणी झाली नाही आणि गाडीला आत प्रवेश मिळाला. वास्तविक, मंत्रालयात कोणत्याही गाडीला प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पास दिला जातो; पण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला तर पासची गरज लागत नाही. त्यामुळे फेरारीला सहज प्रवेश मिळाला. मंत्रालयात पार्क केलेली ही गाडी आणि गाडीचा ‘MH 1 ED 1′ हा व्हीव्हीआयपी क्रमांक चर्चेचा विषय ठरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय? जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय?
मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार...
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाला राज्यात खिंडार
अदानी समूह आणि एसआरएची दादागिरी शिवसेनेने मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला अखेर ब्रेक
अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला आदित्य ठाकरे यांचा विरोध
देशातील सर्वात महाग एक्स्प्रेस वे, बनवण्यासाठी लागले 22 वर्ष, टोल टॅक्स सर्वात जास्त
शिक्षकांचा पगार रखडला, अजितदादांचा थेट अर्थविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन, मिनिटात निकाल
परळीत आका आणि त्यांच्या आकाचे वेगवेगळे उद्योग, पुण्यासह वाल्मीक कराडची कुठे-कुठे किती संपत्ती? पैठणमध्ये सुरेश धस यांचे एकामागून एक गौप्यस्फोट