थोडक्यात – व्ही. नारायण इस्रोचे नवे अध्यक्ष
केंद्र सरकारने अवकाश शास्त्रज्ञ व्ही. नारायण यांची इस्रो अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना अंतराळ विभागाचे सचिवही करण्यात आले आहे. 14 जानेवारी रोजी ते इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्याकडून कार्यभार स्वीकारणार आहेत. नारायण यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. सध्या ते वालियामाला येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
ट्रम्प यांचा हमासला 12 दिवसांचा अल्टिमेटम
वॉशिंग्टन – पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला ओलिसांची सुटका करण्यासाटी 12 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 20 जानेवारीपूर्वी सर्व ओलिसांना सोडले नाही तर मध्यपूर्वेत विध्वंस होईल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. मी कोणत्याही वाटाघाटींना हानी पोहोचवू इच्छित नाही. परंतु शपथ घेण्यापूर्वी ओलिसांच्या सुटकेवर करार केला नाही तर मध्यपूर्वेत विनाश होईल. मला वेगळे काही सांगायची गरज नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आसाममधील खाणीतून एकाचा मृतदेह काढला, नऊ बेपत्ता
गुवाहाटी – आसाममध्ये 200 फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर 9 जण अद्याप बेपत्ता आहेत. दिमा हासाओ जिह्यात असलेल्या या खाणीत अचानक पाण्याचा लोट आल्याने हे खाणकामगार अडकले. ही घटना सोमवारी घडली. लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले आहे. सध्या लष्कर, आसाम रायफल्स, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List