सालोटा किल्ला संरक्षित स्मारक घोषित
नाशिकमधील सालोटा किल्ल्याला राज्य शासनाने आज राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिला. त्याची प्राथमिक अधिसूचना आज जारी केली आली. सातारा येथील महाराणी येसुबाई यांच्या समाधीला राज्य शासनाने गेल्या फेब्रुवारीमध्ये संरक्षित स्मारकाचा दर्जा बहाल केला होता. त्याचीही अंतिम अधिसूचना आज जारी करण्यात आली. सालोटा किल्ला हा नाशिकच्या सटाणा तालुक्यात असून महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सेलबारी-डोलबारी डोंगररांगांमध्ये आहे. या किल्ल्याच्या शेजारीच साल्हेरचा किल्ला आहे. सालोटा किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेल्याने या किल्ल्याचा विकास आणि संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराणी येसुबाई यांची समाधी सातारा जिह्यातील मौजे संगम माहुली येथे आहे. इतिहास तज्ञांनी अनेक वर्षे शोध घेऊन महाराणी येसुबाई यांच्या समाधीचे स्थान निश्चित केले होते. त्यानंतर त्या समाधीला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List