आप नेत्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखले, दिल्लीत ‘शीशमहल’ विरुद्ध ‘राजमहल’ राजकारण तापले

आप नेत्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखले, दिल्लीत ‘शीशमहल’ विरुद्ध ‘राजमहल’ राजकारण तापले

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात आरोप-प्रत्यारोपावरून जुंपली आहे. आपचा ’शीशमहल’ आणि भाजपचा ’राजमहल’ यावरून राजकारण तापले असताना आज आप खासदार संजय सिंह आणि मंत्री सौरभ भारद्वाज प्रसारमाध्यमांसोबत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान दाखवण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखले. यावेळी संजय सिंह आणि पोलिसांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. दोन्ही नेते समर्थकांसह काही काळ तिथेच बसून राहिले. त्यानंतर त्यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बनत असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. परंतु, पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना माघारी पाठवले.

भाजपवर हल्ला चढवताना मंत्री भारद्वाज म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात सोन्याचे शौचालय आहे असे भाजपचे लोक सतत म्हणत आहेत. म्हणूनच आम्ही सोन्याचे शौचालय शोधण्याचा प्रयत्न करत असून याचसाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या निवासस्थानी जात होतो.

केजरीवाल टॉयलेट चोर – भाजप

भाजपने आणखी एका पोस्टरद्वारे अरविंद केजरीवाल यांच्यावर शौचालय चोर असा आरोप केला. ’आपली आवड उघड होईल या भीतीने केजरीवाल यांनी लाखोंच्या टॉयलेट सीट्स चोरल्या. आता त्यांचे हे गुपित दिल्लीतील जनतेसमोर उघड झाल्यावर त्यांनी दोन लोकांना नाटक करायला पाठवले आहे का? संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांनी टॉयलेट सीट्स कुठे लपवल्या आहेत हे केजरीवाल यांना विचारायला हवे’, असे भाजपने ’एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांचा 2700 कोटींचा राजमहल

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणात घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचा आहे, तर प्रत्युत्तरात आपने पंतप्रधानांच्या निवासस्थानाला 2700 कोटी रुपयांचा ‘राजमहल’ असे संबोधले. मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाच्या नूतनीकरणासाठी 8 कोटी रुपयांची निविदा असताना 4 पट अधिक पैसे घेतले असल्याचे म्हणत भाजपने आपवर टीका केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय? जयंत पाटील पक्षातीलच नेत्यांना नकोसे? शरद पवारांसमोरच कोंडी? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबत सूचक विधान काय?
मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार...
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाला राज्यात खिंडार
अदानी समूह आणि एसआरएची दादागिरी शिवसेनेने मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला अखेर ब्रेक
अदानी समूहाची दादागिरी आम्ही मोडून काढली, वांद्रेमधील तोडक कारवाईला आदित्य ठाकरे यांचा विरोध
देशातील सर्वात महाग एक्स्प्रेस वे, बनवण्यासाठी लागले 22 वर्ष, टोल टॅक्स सर्वात जास्त
शिक्षकांचा पगार रखडला, अजितदादांचा थेट अर्थविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन, मिनिटात निकाल
परळीत आका आणि त्यांच्या आकाचे वेगवेगळे उद्योग, पुण्यासह वाल्मीक कराडची कुठे-कुठे किती संपत्ती? पैठणमध्ये सुरेश धस यांचे एकामागून एक गौप्यस्फोट