मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात
मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नेते आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ते देखील शिवसेनेचेच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. लग्न सोहळ्यातच त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्नना सुपारी दिल्याची माहिती किणीकरांना समजली होती. माहिती मिळाल्यानंतर बालाजी किणीकरांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यत घेण्यात आलेले दोघे शिवसेनेचेच असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र या प्रकरणात आमदार बालाजी किणीकर आणि पोलिसांनीही अधिकृतपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात त्यांच्या हत्येचा कट होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अंबरनाथमधून चौथ्यांदा आमदार
बालाजी किणीकर हे अंबरनाथमधून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बालाजी किणीकर चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर गटबाजीतून हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. लग्न सोहळ्यातच त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्नना सुपारी दिल्याची माहिती किणीकरांना समजली होती, त्यांनी या प्रकरणाची माहिती तातडीनं पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ते शिवसेनेचेच असल्याची माहिती समोर आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List