नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत सुरू करण्याचा प्रस्ताव
नागपूर, पुणे आणि मुंबई या मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासासाठी देशभरात सर्वत्र या गाडीची मागणी आहे. पाच ते सात तासांच्या प्रवासाकरिता वंदे भारत आहे. तर त्यापेक्षा अधिक लांबच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस येणार आहे. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यादरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करावी, असा प्रस्ताव नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. या गाडीच्या डब्यांची निर्मिती होत आहे. वंदे भारतच्या नवीन गाडय़ा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाचा असतो, असे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List