बेळगावात भगवा फडकवला; शिवसेनेच्या सहसंपर्कप्रमुखांना समन्स
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक चळवळीच्या लढय़ाचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये भगवा ध्वज फडकविल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, तसेच जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांना उद्या (9 रोजी) बेळगाव येथील न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या महिन्यात बेळगावात आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह इतर कर्नाटकात जात होते. यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी सर्वांना कर्नाटक हद्दीवर ताब्यात घेतले. त्यानंतर बेळगाव जिह्यातील एका गावात गनिमी काव्याने जाऊन ग्रामपंचायतीवर त्यांनी भगवा झेंडा फडकविला होता. त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी देवणे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे यांच्यासह इतरांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजाविले आहे. 9 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणीला उपस्थित राहावे, असे समन्समध्ये म्हटले असल्याची माहिती देवणे यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List