सकाळच्या ‘या’ ४ सवयी तुम्हाला ठेवतील तंदुरुस्त…एकदा नक्की वाचा
तुमच्या दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जात. रात्री तुम्हाला गाढ झोप लागल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही एकदम एनर्जेटिक आणि फ्रेश फिल करता. दिवसाची सुरुवात फ्रेश आणि एनर्जेटिक झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात उर्जा निर्माण होते. तुमच्या शरीरात उर्जा निर्माण झाल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाही.
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. अनेकांना जंक फूज खाण्याची सवय असते ज्यामुळे वजन वाढणे, रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा सारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनाचार्यामध्ये काही विशेष गोष्टी केल्यामुळे तुमची जीवनशैली बदलण्यास मदत होते आणि शरीरात उर्जा निर्माण होते. शरीरात नियमित उर्जा असल्यामुळे तुमचं फोकस कायम राहाण्यास मदत होते. सकाळी या ४ गोष्टी केल्यास तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहाल.
भरपूर पाणी प्या
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. रात्रीच्या दीर्घकाळ झोपेनंतर तुमचे शरीर हायड्रेटेड राहाण्यास मदत होते. तुम्हाला अनेकदा सकाळी उठल्यावर थकवा, डोकेदुखी सारख्या समस्या होतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. सकाळी पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील उर्जा कायम राहाते आणि पाणी तुमच्या शरीरासाठी बूस्टर सारखे काम करते. त्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते आणि शरीर हायड्रेट राहाते.
नियमित व्यायाम करा
दररोज सकाळी उठल्यावर नियमित व्यायाम केल्यास तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते त्यासोबतच तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, त्यासोबतच तुमच्या शरीराती लवचिकता राहाण्यास मदत होते. व्यायाम केल्यामुळे तुमची चिडचिड कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच व्यायामामुळे तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
३० ते ३५ मिनिटे चाला
सकाळी ३० ते ३५ मिनिटे चालल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य व्यायम मिळतो. त्यासोबतच जास्त चालल्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचे व्यायाम होते. चालण तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्यासोबतच सकाळचा सुर्यप्रकाश तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. सकाळच्या सुर्यप्रकाशामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. शरीराला सुर्यप्रकाश मिळाल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात त्यासोबतच शरीरातील उर्जा नियंत्रित राहाते.
पौष्टीक ब्रेकफास्ट
सकाळचा ब्रेकफास्ट पौष्टीक असल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाता. निरोगी ब्रेकफास्टचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते आणि तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. पौष्टीक ब्रेकफास्ट खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि हल्दी फॅट्स मिळते. सकळच्या ब्रेकफास्टमध्ये साखरयुक्त पेय पिणं टाळा यामुळे तुम्हाला मधुमेहाचा धोका होऊ शकतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List