मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या

मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या

नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृती पाहण्यासाठी एकदा तुम्ही मेघालयाला जाऊन याच. मेघालय हे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. हिरवीगार मैदाने, उंच डोंगर, धबधबे आणि शांत नद्या एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाहीत. पण मेघालयची खरी ओळख तिथल्या सुंदर गावांमध्ये आहे. ही गावे केवळ त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाहीत, तर त्यांच्या स्वच्छतेसाठी आणि स्थानिक लोकांच्या आदरातिथ्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत. शहरी जीवनाच्या धकाधकीला कंटाळला असाल तर मेघालयातील गावे तुमच्यासाठी परफेक्ट प्रवेशद्वार ठरू शकतात.

इथलं शांत वातावरण, ताजी हवा आणि हिरवळ तुम्हाला रिलॅक्स वाटेल. निसर्गाबरोबरच अनोख्या चालीरीती, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि साधी जीवनशैलीचा अनुभवही या गावांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. मेघालयातील गावांमध्ये लिव्हिंग रूट ब्रिज, काचेसारख्या स्वच्छ नद्या आणि सुंदर दऱ्या आहेत, ज्या प्रत्येक पर्यटकाचे मन जिंकतात.

तुम्हीही मेघालयच्या ट्रिपचा प्लॅन करत असाल तर इथल्या या खास गावांना भेट द्यायला विसरू नका. ही गावे तुमचा प्रवास खास तर बनवतीलच, पण दीर्घकाळ लक्षात राहतील असा अनुभवही देतील.

1. मावलीनोंग

मावलीनोंग हे आशियाखंडातील सर्वात स्वच्छ गावांपैकी एक आहे. हिरवाईने वेढलेले हे गाव इको फ्रेंडली जीवनशैलीसाठी ओळखले जाते. येथे लिव्हिंग रूट ब्रिज आणि बांबूपासून बनवलेली सुंदर घरे पाहण्यासारखी आहेत. हे गाव “देवाची स्वतःची बाग” म्हणूनही ओळखले जाते. इथे आलात तर गावातील गल्लीबोळात फिरून इथल्या स्थानिक संस्कृतीचा अनुभव घ्या. या गावाभोवतीचे धबधबे आणि वॉचटॉवर्समधून दिसणारे सुंदर दृश्य तुम्ही विसरू शकणार नाही.

2. शानोंगपादेंग

हे गाव उमंगट नदीजवळ वसलेले आहे. ही नदी आशियाखंडातील सर्वात स्वच्छ नदी मानली जाते. या नदीचे पाणी स्फटिक स्वच्छ असून त्यात बोट चालवण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो. या गावात बोटिंग, पोहणे आणि कॅम्पिंग ची एक वेगळीच मजा असते. तसेच येथील नदीजवळ बसून तुम्ही आरामाचे क्षण घालवू शकता.

3. रिवाई

मेघालयातील रेवाई गाव हे एक छोटेसे पण अतिशय सुंदर आणि अनोखे गाव आहे, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि “लिव्हिंग रूट ब्रिज” साठी प्रसिद्ध आहे. हे गाव चेरापुंजीजवळ असून मावलीनोंग गावाजवळ आहे. रेवई हे गाव शांतता आणि हिरवाईचे उत्तम उदाहरण आहे. इथलं वातावरण इतकं शांत आणि स्वच्छ आहे की, तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळचा वाटेल. निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग शौकीनांसाठी हे गाव परफेक्ट आहे.

4. लैतलाम

मेघालयातील लैतलाम हे गाव निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. खासी हिल्सच्या उंच डोंगर आणि हिरव्यागार दऱ्यांमध्ये वसलेले हे गाव आपल्या अद्भुत दृश्यांसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. लैतलाम म्हणजे “जगाचा अंत”, आणि इथून पुढे आपण जगाच्या काठावर उभे आहात असे खरोखरच जाणवते. लैतलाम गाव साहसप्रेमींसाठीही खास आहे. येथील धबधबे पाहण्यासारखे आहेत.

5. डवकी

हे गाव मेघालयातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे गाव भारत-बांगलादेश सीमेजवळ वसलेले असून स्वच्छ नद्या, हिरवळ आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. डावकीची उमंगट नदी ही जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक मानली जाते. या नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की बोटी पाण्याच्या वर तरंगताना दिसतात. डावकीच्या आजूबाजूला अनेक सुंदर धबधबे आणि हिरवीगार जंगले आहेत, जी त्याच्या सौंदर्यात भर घालतात.

मेघालयातील ही गावे पाहण्यासारखी आहेत. मेघालयच्या सहलीचा बेत आखताना या गावांना भेट द्यायला विसरू नका. ही गावे तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतील. परंतु पावसाळ्यात येथे जाणे टाळावे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं
या वयोगटातील असाल तर त्वरीत या ५ सवयी सोडा, अन्यथा पश्चाताप होईल…