अंधेरीत इमारतीला भीषण आग, 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अंधेरीत इमारतीला भीषण  आग, 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुंबईतील अंधेरी येथील पश्चिमेकडील एका बहुमजली इमारतीत काल रात्री 10 च्या सुमारा आग लागली होती. इमारतीच्या 11 व्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे एक 75 वर्षीय वृदध व्यक्ती जखमी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर आणखी एक इसम जखमी आहे. आगीमुळे प्रचंड कल्लोळ माजला होता. फायर ब्रिगेडच्या जवळपास डझनभर घाड्या घटनास्थळी पोहोचल्या रात्री 2 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात यश आलं. या घटनेच दोघे जखमी झाले होते, त्यांच्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेकडील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट भागातील ओबेरॉय कॉम्प्लेक्स येथील एका बहुमजली इमारतीच्या 11 व्या मजल्यावर अचानक आग लागली. इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने तातडीने अग्निशमन दलाला फोन करून या घटनेची माहिती दिली. आगीचे वृत समजताच 15 मिनिटांच्या आतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवली.

या अपघातात एक वृद्धासह आणखी एक व्यक्ती असे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना असून त्याला अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यापैकी 75 वर्षीय वृद्ध इसम राहुल मिश्रा यांचे निधन झाले . तर रौनक मिश्रा ( वय 38) याची प्रकृती आता ठीक असून त्यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मोठमोठ्या इमारतींमध्ये सर्व सुरक्षा व्यवस्था असतानाही आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत. हैदराबादमधील माधापूर येथील इनऑर्बिट मॉलसमोरील सत्य भवनात असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत नुकतीच भीषण आग लागली.
ही घटना एका पाच मजली इमारतीत घडली, जिथे अचानक आगीच्या ज्वाळांनी परिसर व्यापला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून अधिकाऱ्यांनी तात्काळ इमारत रिकामी केली. अग्निशमन दलाने तात्काळ तात्काळ दखल घेत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तैनात केल्या होत्या.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला...
ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली
रंगकाम करायला आला अन्…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; पार्टीत उडवले चोरीचे पैसे
‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले