Photo – राहुल गांधी यांनी परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेतली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुबीयांची भेट घेतली.
परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर हिंसाचार उफाळला होता.
पोलिसांनी गल्लीबोळात कोम्बिग ऑपरेशन करून निष्पाप दलित तरुणांना ताब्यात घेतले.
यात सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याच्या विद्यार्थ्याचाही समावेश होता. कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला.
दलित चळवळीतील लोकनेते विजय वाकोडे यांचाही याच अस्वस्थतेतून हृदयविकाराने मृत्यू झाला.
या दोघांच्याही कुटुंबियांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी त्यांचे सांत्वन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List