बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
मोठी बातमी समोर येत आहे, माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सह्याद्री अतिथिगृहात उपमुख्यमंत्री एकाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला, दिव्यांगांच्या वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्यांचं मानधन वेळेत मिळत नाही. बाहेर राज्यात दिव्यांगांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत महाराष्ट्रात मिळणारं मानधन फारच कमी आहे, अनेक मागण्या पूर्ण होत नाहीत, असा आरोपही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
बाहेरच्या राज्यात दिव्यांगांना जे मानधन मिळतं त्या तुलनेत महाराष्ट्रात जे मानधन मिळतं ते फारच थोड आहे, आणि ते पण वेळेवर मिळत नाही. आम्ही दिव्यांगांसोबत बेईमानी करू शकत नाही. त्यांची भरती देखील होत नाहीये, त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. पदापेक्षा काम महत्वाचे असते, आम्ही काम करू, मी माझा राजीनामा दिला आहे. आमचं प्रेम हे सामान्य लोकांवर आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर आमचं प्रेम आहे. उद्या याच मुद्द्यावरून आंदोलनाची वेळ येऊ शकते. आंदोलन करावं लागेल म्हणून माझी नैतीक जाबाबदारी म्हणून मी राजीनामा दिला. नवीन नियुक्ती लवकर व्हावी अशी आमची इच्छा आहे, सरकार याबाबतचा निर्णय घेईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता. बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद देखील देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं, शिवसेनेच्या अनेक आमदारांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. बच्चू कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपद भेटलं नाही तर त्यांची नियुक्ती ही दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष पदावर करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत देखील बच्चू कडू यांचा यावेळी पराभव झाला, त्यानंतर त्यांनी आता आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List