अमेरिकेतील नोरोव्हायरसची लक्षणे कोणती ? काय उपाय करावेत ? घ्या जाणून

अमेरिकेतील नोरोव्हायरसची लक्षणे कोणती ? काय उपाय करावेत ? घ्या जाणून

America Norovirus: आज आम्ही तुम्हाला नोरोव्हायरस याविषयी माहिती देणार आहोत. अमेरिकेत नोरोव्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. डिसेंबरपासून आतापर्यंत या विषाणूचे 90 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. नोरोव्हायरस हा वेगाने पसरणारा आजार आहे. या नोरोव्हायरसविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या बऱ्याच भागांमध्ये नोरोव्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. नोरोव्हायरस म्हणजे काय? याची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध जाणून घ्या.

नोरोव्हायरस पोट आणि आतड्यांवर परिणाम करतो. याच कारणास्तव, विषाणूला गॅस्ट्रोएन्टेरिटिस रोग देखील म्हणतात. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला उलट्या, अतिसार, पोटदुखी अशी लक्षणे आढळतात. काही प्रकरणांमध्ये डोकेदुखी आणि सतत थकवा येण्याची ही समस्या असते.

दूषित अन्न-पाणी आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून हा आजार पसरतो. सहसा, बहुतेक प्रकरणे संक्रमित अन्नाची असतात. नोरोव्हायरसवर कोणताही निर्धारित उपचार नाही. लक्षणांच्या आधारे रुग्णावर उपचार केले जातात.

अमेरिकेत का पसरत आहे नोरोव्हायरस ?

डॉ. जुगल किशोर सांगतात की, नोरोव्हायरस हा काही नवीन आजार नाही. हा अनेक दशके जुना आजार आहे. 1968 मध्ये ओहायोतील नॉरवॉक येथील एका शाळेत या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी सापडलेल्या स्ट्रेनला नॉरवॉक व्हायरस म्हणून ओळखले जात होते. नंतर त्याला नोरोव्हायरस असे नाव देण्यात आले.

लक्षणे 1 ते 2 दिवसांत दिसतात

डॉ. किशोर सांगतात की, नोरोव्हायरस हा अमेरिकेतील एक सामान्य आजार आहे आणि त्याचे रुग्ण तेथे येत राहतात. हा विषाणू पोट आणि आतड्यांवर परिणाम करतो. लक्षणे सहसा 1 ते 2 दिवसांत दिसून येतात आणि एका आठवड्यापर्यंत टिकू शकतात.

भारताला कोणताही गंभीर धोका नाही

नोरोव्हायरस प्राणघातक नाही आणि लक्षणे वेळीच ओळखून तो सहज रोखला जातो. मात्र, वृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांना या विषाणूपासून वाचवण्याची गरज आहे. सध्या अमेरिकेत या व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. भारताला कोणताही गंभीर धोका नाही.

नोरोव्हायरसपासून बचाव कसा करावा?

नियमितपणे हात धुण्यास सुरुवात करा
दूषित अन्न आणि पाणी टाळा
संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळा.
पोटाचे काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Bandra Bharatnagar : ‘पोलीस कमी पडतील’, वांद्रयात अदानीच्या एका प्रोजेक्टवरुन राड्याची स्थिती Bandra Bharatnagar : ‘पोलीस कमी पडतील’, वांद्रयात अदानीच्या एका प्रोजेक्टवरुन राड्याची स्थिती
वांद्र्याच्या भारत नगरमध्ये SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार आहे. त्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला आहे. एसआरएचे अधिकारी JCB सह...
इंडस्ट्रीतील सर्वांत महागडा घटस्फोट; तब्बल इतक्या कोटींची पोटगी, आता पूर्व पत्नीसोबत चांगलीच मैत्री
हिना खानला ज्या रात्री कॅन्सरविषयी समजलं तेव्हा खाल्लं गोड; म्हणाली “बॉयफ्रेंड घरी आला अन्..”
बॉलिवूडमध्ये यायची एवढी घाई का? सेटवर बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी रवीना टंडनची लेक ट्रोल
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा कंपनीचा ठेका रद्द
ग्राहक आयोगाने तडजोड घडवून आणली… अन् 16 शेतकऱ्यांना मिळाले 30 लाख 40 हजार !
खेळाडूंच्या ब्लेझरप्रकरणी ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी स्वतःच समिती नेमली