पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 फेब्रुवारीपासून रंगणार
पुणे फिल्म फाऊंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स बंडगार्डन आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपट महोत्सवात जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये सुमारे 150 हून अधिक देशी-विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येतील. शोमैन राज कपूर यांची 100 वी जयंती ही या वर्षाची थीम असणार आहे.
प्रक्रिया ३ फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व पुणे फिल्म फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषेदत दिली. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते हे उपस्थित होते.
जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १०५७ हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत अंतिम फेरीतील हे 14 चित्रपट बघून सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल. त्यास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ १० लाख रुपये देऊन समारोप कार्यक्रमात गौरवले जाईल.
जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात निवडलेले 14 चित्रपट
१. डार्केस्ट मीरियम : दिग्दर्शक नाओमी जये, कॅनडा २. ऑन द इन्वेंशन ऑफ स्पिशिज दिग्दर्शक तानिया हरमीड, इक्वाडोर, क्यूबा ३. टू अ लँड अननोन : दिग्दर्शक महद्दी फ्लेफेल, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ग्रीस, कतार, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन ४. ग्रैंड टूर : दिग्दर्शक मिगुएल गोम्स, पोर्तुगाल, इटली, फ्रान्स ५ अरमंड: दिग्दर्शक हलफदान उल्लमांन तोंडेल, नॉर्वे, नेदरलँड, जर्मनी, स्वीडन ६. सेक्स : दिग्दर्शक डेंग जोहान हाठगेरूड, नॉर्वे ७. इलेक्ट्रिक फील्ड्स दिग्दर्शक लिसा गेट्सच, स्वित्झर्लंड ८. अंडर द वोल्केनो दिग्दर्शक डेमियन कोकूर, पोलंड ९. ए ट्रॉवेलर्स नीड्स : दिग्दर्शक हाँग सांगसू, दक्षिण कोरिया १०. ब्लैक टी : दिग्दर्शक अब्दुर्रहमान सिसाको, फ्रान्स, मॉरिटानिया, लक्झेंबर्ग, तैवान, आयव्हरी कोस्ट ११. सम रेन मस्ट फॉल दिग्दर्शक यांग क्यू, चीन, अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर १२. एप्रिल : दिग्दर्शक डी कुटुंबेगश्वील, फ्रान्स, इटली, जॉर्जिया १३. श्री किलोमीटर्स टू द एंड ऑफ द र्वल्ड्स दिग्दर्शक एमानुअल पर्नू, रोमानिया १४. इन रिट्रीट : दिग्दर्शक मैसम अली, इंडिया
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List