रशियाचा युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 100 ठिकाणांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाने एकाच वेळी युक्रेनमधील 100 ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यांनी TU-95 बॉम्बरमधून क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत. गेल्या 3 वर्षातील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. रशियाचा हा हल्ला युक्रेनवर केलेला पलटवार असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी मंगळवारी रात्री युक्रेनने रशियावर हल्ला केला होता.
रशियाने केलेल्या हल्ल्यात कीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. हल्ल्यानंतर अनेक इमारतींना आग लागली. या हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला, याचा आकडा अद्याप युक्रेननं जाहीर केलेला नाही. रशियाने क्रूझ क्षेपणास्त्राने हा हल्ला केला आहे.
या हल्ल्यात युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे, असं बोललं जात आहे. रशियाने सकाळी 6.30 वाजता पहिला हल्ला केला. हल्ल्यानंतर संपूर्ण कीवमध्ये इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. येथे लोकांना सतर्क करण्यासाठी सतत सायरन वाजत असतात. अनेक लोकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे.
रशियाच्या हल्ल्यांबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं वक्तव्यही समोर आलं आहे. झेलेन्स्की यांनी सांगितलं की, ”40 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हा हल्ला करण्यात आला. 30 रशियन क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List