Mumbai Local Train – आसनगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल
कामाला जाण्याची घाई असताना ऐनवेळी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे.
आज पहाटेच्या सुमारास मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. आसनगाव स्थानकातील विद्युत पॅनेलमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. तांत्रिक बिघाडामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून आसनगावला येणाऱ्या लोकल काही खोळंबल्या होत्या. यामुळे कामावर जाण्याची घाई असतानाच हा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.
रेल्वेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आणि तात्काळ तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List