Saif Ali Khan Attacked – चोरीसाठी घरात घुसला होता, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली; पोलिसांनी दिली मोठी अपटेड
अभिनेता सैफ अली खानवर वार करणाऱ्या आरोपीची ओळख पटल्याची मोठी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी झोन 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना माहिती दिली. अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री जो हल्ला झाला या प्रकरणी पोलिसांची 10 वेगवेगळी पथकं तपास करत आहेत. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलीस अधिकारी गेडाम यांनी सांगितले.
#WATCH | Over attack on Actor Saif Ali Khan,
Dixit Gedam, DCP Zone 9, Mumbai Police says, “Last night, “The accused used a fire escape staircase to enter Saif Ali Khan’s house. It appears to be a robbery attempt. We working to arrest the accused. 10 Detection teams are working… pic.twitter.com/g6oLZH9w7f— ANI (@ANI) January 16, 2025
आतापर्यंतच्या तपासात हा चोरीचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. आरोपीला लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर पुढील सर्व माहिती माध्यमांना दिली जाईल, असे गेडाम म्हणाले.
इमारतीवरील अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्यानं आरोपीने इमारतीमध्ये प्रवेश केला. यानंतर जिन्याच्या वापर करत तो घरात घुसला होता. या आरोपीची ओळख पटली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त गेडाम यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List