हा तर ‘जोक ऑफ द डिकेड’, संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला

हा तर ‘जोक ऑफ द डिकेड’, संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. नौदलाच्या पाणबुडी आणि युद्धनौकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठकही घेतली. यात मार्गदर्शन करताना मोदींनी द्वेषभावना बाळगू नका, प्रतिमा जपा, असे सल्ले आमदारांना दिले. मात्र ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच मंचावर घेऊन प्रतिमा जपा म्हणणे हा ‘जोक ऑफ द डिकेड’, असल्याची खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

द्वेषभावनेचे सर्वात मोठे कोठार भारतीय जनता पक्ष आणि मोदी आहेत. मोदी म्हणालेत प्रतिमा जपा. पण सरकारमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते असून त्यांच्यावर स्वत: पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते मंचावर असताना मोदी प्रतिमा जपा सांगतात म्हणजे मोठा विनोदच आहे. तुमच्या पक्षात कोण आहेत, समर्थक कोण आहेत, दिल्लीत आणि महाराष्ट्रात तुम्ही कुणाच्या पाठींब्याने सरकार बनवली आहेत. वर्षभरापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या बाजुला बसले आहेत आणि हे प्रतिमेला जपा असा संदेत देताहेत. कसली आणि कुणाची प्रतिमा? तुम्ही या देशातील राजकारणाची प्रतिमा मलिन केलेली आहे, त्यावर बोला, असेही राऊत म्हणाले.

काहीतरी केमिकल लोचा

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला छगन भुजबळ, धनंजय मुंडे गैरहजर राहिले की त्यांना ठेवले? तो प्रतिमेचा न्याय असेल तर सगळ्यात आधी अजित पवार यांना टोपलीखाली झाकून ठेवायला हवे होते. त्यांच्यासारखे अनेक नेते ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते मंचावर होते, मार्गदर्शन ऐकत होते. त्यांना का नाही झाकून ठेवले, हा काहीतरी केमिकल लोचा दिसतोय, असा टोला राऊत यांनी लगावला.

राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर घणाघात

विरोधकांनाही ही मुभा मिळणार का?

पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेला राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला. नौदलाच्या सभागृहात भाजप किंवा समर्थित आमदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी विरोधकांनाही मिळणार का? तिथल्या खानपान सेवेचे पैसे कुणी दिले? असा सवाल राऊत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे....
गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठी बातमी, अखेर वर्षभरानंतर या आरोपीला बेड्या
सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा कोण होता? खून करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेला का? गृहराज्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
सैफ अली खानचे ते 9 चित्रपट ज्यावर करोडो रुपये लागलेत; हल्ला झालेल्या घटनेचा परिणाम होणार का?
सैफ अली खानच्या हत्येचाच हेतू होता का? बॉलिवूडच्या व्हिलनला संशय; म्हणाले, ही तर लज्जास्पद…
सैफवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी, म्हणाल्या जशी देशमुख, सुर्यवंशी कुटुंबाला…
Saif Ali Khan वर ज्या घरात हल्ला झाला, ते किती आलिशान Inside PHOTOS बघा